परिचय – परिक्षण

माझे आवडते पुस्तक मृत्युंजय

Category:

 

लहानपणापासून मला पुस्तकवाचनाची आवड लागली आणि उत्तरोत्तर ती वाढत गेली. कथा,कादंबऱ्या, कविता, भयकथा, रहस्यकथा, नाटकं,प्रवासवर्णने आणि असंख्य प्रकारची पुस्तके असा माझा वाचनाचा जबरदस्त कॅनव्हास आहे. पु ल देशपांडे यांच्यापासून ते दया पवार ,अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या असंख्य अभिजात साहित्यिकांची आणि लेखकांची अगणित पुस्तकं वाचताना मी झपाटून गेलो.विविध लेखकांच्या प्रतिभाविलासाने मी थक्क होऊन गेलो.

  April 26, 2023


लेखसंग्रह

दिशा – पालकत्वाची

Category:

 

तसं पाहिलं तर रोहनला लहान मुलांची खूप आवड. “त्याच्या धाकट्या भावालाही त्याने अगदी प्रेमाने वाढवलं. मला सांभाळण्यासाठी काही वेगळं करायला लागलंच नाही!” असं त्याची आई सगळ्यांना अगदी आनंदाने सांगते. पण रोहनचं लग्नंच झालं नाही तर मग मुलं तर दूरच! धाकटा भाऊ मात्र आताशा लग्न करून अमेरिकेत स्थिरावला होता. त्यामुळे रोहनची आईला सदोदित चिंता भेडसावत रहायची. त्यावर तो आईला नेहमी म्हणायचा, “लग्न काय मुलं जन्माला घालायची म्हणूनच करतात का? सहचारी हवी म्हणून करतात. लग्न होईल तेव्हा होईल तू काळजी नको करू.

  April 26, 2023


लेखसंग्रह

मी पाहिलेली ऊर्जा

Category:

 

अखंड ऊर्जेचे नैसर्गिक वरदानच त्यांना लाभलं होतं जणू! ‘तुझ्यापाशी जे जे  काही आहे ते मुक्त हस्ते समाजाला देत राहा तू,’ असा ईश्वरी संकेत त्यांना मिळाला असावा बहुधा आणि त्यांनी तो आयुष्यभर इमाने-इतबारे पाळला. गोरगरिबांना यथाशक्ती दानधर्मही केला.

  April 26, 2023


लेखसंग्रह

आनंदाचे ठसे

Category:

 

ब्रँचमधे स्टाफ तसा पुरेसा होता. जवळजवळ सगळेच अनुभवी. अपवाद फक्त रिसिव्हिंग कॅश काऊंटरवरची  सुजाता बोबडे. नुकतीच जॉईन झालेली. त्यामुळे कामाची फारशी माहिती नाही आणि त्यामुळे आत्मविश्वासाचाही अभाव. अर्थात हेडकॅशिअर श्री सुहास गर्दे नियमांवर बोट ठेवून काम न करता तिला स्वतःचे काम सांभाळून मदत करायचे म्हणून रोजचं रुटीन व्यवस्थित सुरू होतं एवढंच. एरवी सुजाताच्या वर्क-कॉलिटी बद्दल मी फारसा समाधानी नव्हतो.

  April 26, 2023


लेखसंग्रह

औषधांची साठवण कशी करायची

Category:

 

औषधांची परिणामकारकता व सर्व गुणधर्म जपण्यासाठी त्यांची घरात योग्य ठिकाणी साठवण करणे आवश्यक असते. सूर्यप्रकाश, उष्णता, दमटपणा, पाणी यामुळे औषधांचे विघटन होऊन मुदतीआधीच ती निरुपयोगी होऊ शकतात. म्हणूनच खिडकीत, फ्रीजवर, टी. व्ही. वा ओव्हनवर, गॅसजवळ, किचन टेबलवर (चटणी, लोणच्यांच्या सोबत), बाथरूममध्ये, बेसीनजवळ अशा ठिकाणी औषधे ठेवू नयेत. कोरड्या व थंड ठिकाणी औषधे ठेवणे उत्तम. शक्यतो घरातील सर्व औषधे एका ठिकाणी असावीत.

  April 26, 2023


नॉस्टॅल्जिया

माझं हार्मोनियम वादनाचं प्रेम

Category:

 

आम्ही हुबळीला होतो तेव्हां मी चौथीत होते.,त्यावेळी शाळेत नुकताच गाण्याचा क्लास सुरु झाला होता..पण पाचवीपासून ,त्यामुळे मला सामील होता आलं नाही. एक मोडक नावाचे शिक्षक होते..मी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत त्यांना जाऊन भेटले आणि मला पेटी शिकवाल का म्हणून विचारले होते..ते ” हो..हो” म्हणाले , पण जेव्हां मी पिच्छा सोडला नाही तेव्हां त्यांनी मला ” सा रे ग म…” वाजवून कोणतं बोट कुठे ठेवायचं वगैरे सांगितलं.

  April 25, 2023


अवर्गिकृत

अधू झाली माय !

Category:

 

सर्वात खालच्या 50 गुंठ्याच्या जाड काळ्या मातीच्या तुकड्यात व गोविंदा बाबाच्या वाट्याने केलेल्या 15 गुंठे पट्टीत असा एकूण सात ट्रक ऊस म्हणजेच 84 टन उस संगमनेर कारखान्याला गेला होता. नानांनी त्यांची पूर्ण ताकद उसाला लावलेली होती . गावातील व आजूबाजूची सर्व शेतकरी मंडळी नानांच्या या पीक उत्पादन पद्धतीचे जिकडे तिकडे नवल करत होती.

  April 25, 2023


लेखसंग्रह

समृद्ध शेती, श्रीमंत शेतकरी काल, आज आणि उद्या

Category:

 

शेती आणि शेतकरी देशातील सर्वात महत्त्वाचा घटक जो आपणास कधीही उपाशी ठेवत नाही मित्रहो आज आपण भारतीय शेतीचा इतिहास सुरुवात नवनिर्मिती तंत्रज्ञान प्रगती संशोधन उद्योग व्यवसाय निर्यात पर्यटन आणि बरेच काही  या लेखातून आपण चर्चा करूया.

  April 25, 2023


लेखसंग्रह

अंगावरच्या पुरळासह येणारे ताप

Category:

 

कांजिण्या: प्रत्यक्ष लागण झाल्यापासून दहा ते सतरा दिवसांत होणारा हा विषाणूजन्य आजार आपल्या ओळखीचा आहे. लहान मुलांमध्ये प्रामुख्याने दिसणारा हा आजार मोठेपणीही होऊ शकतो; पण एकदा होऊन गेला असेल तर सहसा पुन्हा होत नाही. हवेतून, प्रत्यक्ष स्पर्शाद्वारे किंवा हाताळलेल्या वस्तूंद्वारे विषाणू पसरतात. एखादा दिवस ताप, भूक मंदावणे, सर्दी अशी |लक्षणे दिसल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पाण्यासारखे फोड छाती-पोटावर आणि इतरही अंगावर उठू लागतात

  April 25, 2023