लेखसंग्रह

बाईपण भारी देवा…एक अप्रतिम चित्रपट…

Category:

 

बाईपण भारी देवा हा एक अप्रतिम चित्रपट आहे. या चित्रपटात ( मंगळागौर  ) या नृत्याला  मध्यभागी ठेवून चित्रपटाची कथा उत्तम गुंफलेली आहे. मनोरंजन करता करता या चित्रपटातून स्त्रियांच्या अनेक समस्या मांडण्याचा उत्तम प्रयत्न केला गेला आहे.

  July 26, 2023


कथा

गुंतता

Category:

 

लहान असेंन मी त्यावेळी आठवी नववीत जेव्हा त्यांचे लग्न झाले तो गावाकडचा पण शहरात स्थायिक झालेला, चांगली नोकरी होती परंतु लगेचं करत नव्हता. एकदाचे त्याने उशीरा का होईना लग्न केले. ती पण जरा जास्त वयाची होती, थोडी रखडलेली होती. कमी शिकलेली , मॅट्रिकपर्यंत घरात गावी सगळी कामे करत असे.

  July 26, 2023


साहित्य - ललित

स्त्री: विविध अनुभूतींनी परिपूर्ण एक अजूबा

Category:

 

स्त्री म्हणजे काय आहे?’ या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर देता येईल. स्त्री म्हणजे एक ‘अजूबा’ आश्चर्य आहे. परमेश्वराची अजोड निर्मिती आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या निसर्गाच्या परिचक्रातील पहिली महत्त्वाची गोष्ट. उत्पत्ती – म्हणजे एखादी गोष्ट निर्माण होणे. स्थिती – म्हणजे पृथ्वीवरील एखाद्या गोष्टीचे अस्तित्व आणि तिसरी स्थिती – लय म्हणजे एखादी गोष्ट संपून जाणे, विलय पावणे, मृत्यू. सर्व सृष्टी या परिचक्राला बांधलेली आहे. परंतु यातील – निर्मिती, उत्पत्तीची ताकद महत्त्वाची आहे.

  July 26, 2023


खाद्ययात्रा

जगातील सर्वात जुनी भाजी – भरल्या वांग्याचा रस्सा

Category:

 

भारतीय रेसीपीज इतर कोणत्याही रेसीपीज पेक्षा कलात्मक आहेत, चविष्ट आहेत आणि आरोग्यदायी सुद्धा आहेत यात शंकाच नाही, फक्त भारतीयांना स्वतःला प्रोजेक्ट करता येत नाही इतकेच.

  July 25, 2023


साहित्य - ललित

ज्युबिली वास्तु

Category:

 

बैजु बावरा’ चित्रपटाचा कधी उल्लेख झाला की, त्यातील शांत व निर्विकार चेहऱ्याचा नायक, भारत भूषण सर्वांना आठवतोच… या नशीबवान भारत भूषणला, मधुबाला व मीना कुमारी सारख्या सुंदर नायिका मिळाल्या.. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वांद्रे येथील कार्टर रोडवरील समुद्रकिनारी एक बंगला खरेदी केला. पुढे हाच बंगला राजेंद्र कुमार यांनी भारत भूषण यांचेकडून अवघ्या साठ हजार रुपयांत खरेदी केला व त्याला नाव दिले, ‘डिंपल’!!

  July 25, 2023


लेखसंग्रह

विमानांपेक्षा मोटारींचे अपघात जास्त का?

Category:

 

आपल्या देशात फार मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर असतात. त्यातही काही सावकाश चालणारी तर काही वेगवान असतात. आकाशात तसे नसते. काहीवेळा विमाने उतरताना किंवा वर जाताना गर्दी असते पण सगळे काम क्रमवारीने होते. कोणी मध्ये घुसत नाही. विमानाच्या हालचालीत नियंत्रण असते आणि त्यात सुसूत्रता असते.

  July 24, 2023


साहित्य - ललित

शब्द बापुडे केवळ वारा

Category:

 

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते म्हणून ओळखली जातात. पैकी पृथ्वीच्या आधारानेच सगळे जीवन चालते आणि आप म्हणजे पाणी हे तर मूर्तीमंत जीवनच. तेजोमय लोहगोल म्हणजे भगवान् सूर्यनारायण वायू आणि आकाश या दोन गोष्टींचा संदर्भ सहजासहजी लागत नाही.

  July 24, 2023


लेखसंग्रह

सैन्यदलातील मिग विमानाचे अपघात जास्त का?

Category:

 

वरवर पाहता मिग विमानांचे अपघात जास्त वाटले तरी दर दहा हजार तासांच्या उड्डाणांच्या हिशेबात जगातील अनेक प्रगत वायुदलातील अपघातांपेक्षा हे प्रमाण कमी आहे. म्हणजे भारतातील व्यावसायिक वैमानिकच काय पण शिकाऊ वैमानिकही इतर देशांच्या तुलनेत अधिक कसबी आहेत. पण तरीही अपघात हा अपघातच आणि तो वाईटच. म्हणून तो पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी आणि त्यातून काही शिकायला हवे.

  July 23, 2023