जरी मी चालतोही एकटा
असे तुमची सावली सोबती
धरुनीया बोट जन्मदात्यांचे
कृपाळु, चालवितो सुखांती...
भेटता सहृद तुम्हासारखे
रुजली अंतरी भावप्रीती
अरुपाचे रूपडेही आगळे
दृष्टांत सावलीत उजळीती...
सत्कर्मे अनुभवता दुनिया
सावलीत ब्रह्मानंदी तृप्ती...
जे जे पेरावे ते तेच उगवते
कृतज्ञतेतुनी ओसंडते मुक्ती...
अशा भावनांच्या प्रेमादरात
सावलीसंगे निर्मली मन:शांती...
प्रांजळ प्रेमची सदा देत रहावे
फुलवित जावी निष्पाप प्रीती...
रचना क्र. ५६
२५ /६ /२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
जरी मी चालतोही एकटा
असे तुमची सावली सोबती
धरुनीया बोट जन्मदात्यांचे
कृपाळु, चालवितो सुखांती…
भेटता सहृद तुम्हासारखे
रुजली अंतरी भावप्रीती
अरुपाचे रूपडेही आगळे
दृष्टांत सावलीत उजळीती…
सत्कर्मे अनुभवता दुनिया
सावलीत ब्रह्मानंदी तृप्ती…
जे जे पेरावे ते तेच उगवते
कृतज्ञतेतुनी ओसंडते मुक्ती…
अशा भावनांच्या प्रेमादरात
सावलीसंगे निर्मली मन:शांती…
प्रांजळ प्रेमची सदा देत रहावे
फुलवित जावी निष्पाप प्रीती…
रचना क्र. ५६
२५ /६ /२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
Post Views: 10