साहित्य - ललित

असली काय आणि नकली काय ? सगळंच शेम टू शेम

Category:

 

जगभरात जेवढ्या म्हणून प्रेक्षणीय वास्तू आहेत त्यांची नक्कल करण्याचे प्रयत्न आतापर्यंत झाले व यापुढेही होतील. डुप्लिकेटच्या जमान्यात लोकांनी देवांनाही सोडले नाही. अगदी पंतप्रधान मोदींसारखी हुबेहूब दिसणारी व्यक्तीदेखील मुंबईत आहे. शेम टू शेम!

  July 10, 2014


साहित्य - ललित

शब्दकोडे

Category:

 

वर्तमानपत्र ,शब्दकोडे आणि वाचक यांचे काही वर्षापुर्वी त्रिकूटच तयार झालेलं होत असं म्ह्टल तर ते वावग ठरणार नाही. पुर्वी काही वर्तमानपत्रे फक्त शब्दकोड्यांमुळेच ओळखली जात होती अस म्ह्णा अथवा काही वर्तमानपत्रे फक्त शब्दकोड्यांसाठीच विकत घेतली जात होती असे ही म्ह्णता येईल . 

  July 3, 2014


अवर्गिकृत

पाऊस

Category:

 

पाऊस

पाऊस

मला हवा असतो प्रत्येक वर्षी

कारण त्या शिवाय माझ्या एका

नवीन कवितेचा जन्म होणारच नसतो…

पाऊस

कोसळण्याची वाट मी चातकासारखी पाहतो

कारण त्या शिवाय मी तिला

पावसात भिजताना पाहू शकणार नसतो…

पाऊसात

मी भिजवून सतत ओलाचिंब होतो

कारण त्या शिवाय माझ्या कल्पनेला

पुन्हा नवीन अंकूर फुटतच नसतो…

पाऊस

मुसळ्धार कोसळ्ण्याची वाट पाहत असतो

कारण त्या शिवाय मी पाण्यातून

रस्ता काढत चालू शकणार नसतो…

पाऊसात

भिजणारा शेतकरी पाहायला मला आवडतो

कारण त्या शिवाय मला सर्वात

आनंदी चेहरा पाहायला मिळ्णार नसतो…

कवी – निलेश बामणे ( एन. डी. )

  July 3, 2014