लेखसंग्रह

धुळीचे साम्राज्य आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Category:

 

मुंबईत पावसाळ्यानंतर हवामानात अचानक कोरडेपणा आपल्यामुळे सगळीकडे धूळ मिश्रीत हवामान आहे. सातत्याने होत असलेल्या हवामानातील बदलांमुळे वाढत असलेला उष्मा, धूळ आणि धुराळामिश्रीत बदलती हवा मुंबईकरांच्या समस्या रोज वाढवतच आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा चेंबूर, देवनार, सायन या भागात राहणाऱ्या अनेकांनी आरोग्याच्या तक्रारींमुळे राहती घर भाड्याने देऊन उपनगरांमध्ये शिफ्ट झाले आहेत. कचऱ्याच्या डम्पिंगमुळे होणारे श्वसनविकार आणि त्वचाविकारांमध्ये सातत्याने भर पडते आहे. गरोदर महिला, लहान मुले व वयोवृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे.

  November 21, 2017


मालदीव
शहरे आणि गावे

मालदीव

Category:

 

मालदीवचे प्रजासत्ताक हा दक्षिण आशियाच्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक द्वीपसमूह आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान २६ बेटांवर उत्तर-दक्षिण वसलेला आहे. ही द्वीपे श्रीलंकेच्या नैर्ऋत्येस ७५० किलोमीटरवर आणि भारताच्या नैर्ऋत्येस ६०० किलोमीटरवर आहेत.

  November 21, 2017