नॉस्टॅल्जिया

आठवणीतले गिरणगाव

Category:

 

लालबाग च्या आसपासचा हा परिसर ह्या परिसरात असलेल्या कापडांच्या गिरण्यांमुळे गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होता. तीन शिफ्ट मध्ये जाणाऱ्या कामगारांचा लोंढा हा परिसर रात्रंदिवस जिवंत ठेवीत असे. गिरण्यांच्या भोंग्यावरून टाईम लावला जात असे. फूट-पाथ प्रशस्त होते आणि तरीही भरलेले असत. त्यावर फेरीवाले, भाजीवाले असायचे, कामगार वर्ग आपल्या छोट्या मीटिंगी येथेच करत. दुकानांमधून गर्दी डोकावत असे. रात्री २ ते सकाळी पाच एवढा वेळ हा परिसर त्यातल्या त्यात शांत असे. गिरण्यांचा संप झाल्यावर आणि पुढे गिरण्या बंद होऊन इथला कामगार वर्ग देशोधडीला लागल्यानंतर ह्या गिरणगावाची रया गेली ती पुन्हा आलीच नाही.

  October 1, 2018


लेखसंग्रह

साउथ आफ्रिका संस्कृती(!!)

Category:

 

एखाद्या देशात साधारणपणे, ५ वर्षे राहिले की सर्वसाधारण समाजाची कल्पना येऊ शकते. साउथ आफ्रिका, स्पष्टपणे, ४ समाजात विभागाला आहे. १] काळे (मूळ रहिवासी), २] गोरे (जवळपास ३०० हून अधिक वर्षे वास्तव्य), ३] भारतीय वंशाचे (नुकतीच १५० वर्षे पूर्ण झाली!!) ४] कलर्ड ( मिश्र संयोगातून जन्मलेला समाज).

  October 1, 2018


लेखसंग्रह

साउथ आफ्रिका संस्कृती(!!)

Category:

 

एखाद्या देशात साधारणपणे, ५ वर्षे राहिले की सर्वसाधारण समाजाची कल्पना येऊ शकते. साउथ आफ्रिका, स्पष्टपणे, ४ समाजात विभागाला आहे. १] काळे (मूळ रहिवासी), २] गोरे (जवळपास ३०० हून अधिक वर्षे वास्तव्य), ३] भारतीय वंशाचे (नुकतीच १५० वर्षे पूर्ण झाली!!) ४] कलर्ड ( मिश्र संयोगातून जन्मलेला समाज).

  October 1, 2018


लेखसंग्रह

व्हॉटसअप, फेसबूक आणि गोठलेली संवेदना

Category:

 

माणूस किती असंवेदनशील बनत चाललेला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या आपण इतके आहारी गेलो आहे की, आपल्यालातील एकमेकांप्रती असलेला जिव्हाळा, प्रेम,माया, ममता आणि आपुलकीची भावना नष्ट होत चालली आहे. आपण तंत्रज्ञानाच्या युगात इतके व्यवहारी होत चाललो आहोत की, आपल्याला रक्ताची नातीही कळेनाशी झालेली आहेत. कुणीही जगल्या – मेल्याचं सोयर- सुतक कुणालाही राहील नाही.

  September 29, 2018


साहित्य - ललित

नवकवीचा विळखा

Category:

 

दोन महिने उलटून गेले तरी एजंटचा फोन किंवा पॅनकार्ड यापैकी काहीच आले नाही. एजंटला फोन केला तर त्याचे भलतीच बातमी दिली. त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन दिलेला माझा फॉर्मच त्याला सापडत नव्हता. उद्या सकाळी ऑफिसमध्ये या आणि शोधा असे सांगण्यात आले. पुन्हा दुसर्‍यादिवशी सकाळ सकाळी त्याच्या ऑफिसमध्ये गेलो. मी भेटलेल्या एजंटचा पत्ता नव्हता. बाजूलाच दोघेजण खाली मान घालून आपापले काम करत बसले होते, त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करणे बरोबर नव्हते.

  September 28, 2018