लेखसंग्रह

दहशतवाद्यांची आर्थिक मदत थांबवण्याकरता एनआयएची चमकदार कामगिरी

Category:

 

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएला व्यापक अधिकार देणारे सुधारणा विधेयक लोकसभेत पारित झाल्याने देशविरोधी शक्तींना वठणीवर आणणे शक्य होणार आहे. दहशतवाद्यांना आणि त्यांची पाठराखण करणार्‍यांना कठोर शासन करण्याच्या दृष्टीने एनआयएची व्याप्ती वाढविणे गरजेचेच होते. ते अतिशय महत्त्वपूर्ण काम सरकारने केले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेची व्याप्ती वाढविली याचे प्रत्येक भारतीयाने स्वागतच केले पाहिजे.केंद्रातल्या सत्तेत कुणीही असो, सरकार जर देशहिताचा विचार करून कायदा करणार असेल, तर त्याला पक्षीय मतभेद विसरून सगळ्यांनीच पाठिंबा दिला पाहिजे.

  August 3, 2019


लेखसंग्रह

वासंतिक झुळूक ….. फुलोरा

Category:

 

हैदराबादच्या आमच्या घराजवळच एक छोटीशी टेकडी आहे. त्यावर एक लहानसं गार्डन आहे. आम्ही रोज सकाळी इथे चालायला जातो. आज जरा अंमळ लवकरच गेलो. साडे सहाच्या थोडसं अगोदरच. वातावरण अति प्रसन्न होतेच पण आजचा सकाळचा वारा काही वेगळाच होता. त्यात असा एक सुखद गारवा होता की जो अंतर्मनाला फार सुंदर स्पर्श करत होता. एक तास झाला पण आज पाय निघत नव्हता.

  August 3, 2019


साहित्य - ललित

बायको आणि मैत्रिण

Category:

 

दोन घट्ट वेण्या घालून, सोबत शाळेत येणारी शेजारची ‘निमी ‘, अचानक एके दिवशी सुंदर पौनी टेल करून येते. ‘ये तुम्ही पोर पोर, तिकडं पलीकडं खेळा’ म्हणणारी, हल्ली स्वतःच दूर जाऊन खेळते. फडतूस विनोदाला घोड्या सारखं खिंकाळून हसणारी, मंद गालातल्या गालात हसते. काल पर्यंत, ‘ये मला सायकल शिकव ना ‘ म्हणणारी, ‘चल निमे आपण सायकल खेळू, मी, शिकवतो तुला’, म्हणलं तरी, ‘नको आई रागावते अन मला काम पण आहे.’ म्हणून येण्याचे टाळते. शाळा सुटल्यावर, गरगर दप्तर फिरवून पाठीवर घेत, धूम घरा कडे पळणारी ‘निमा’, आता मात्र छातीशी वह्या पुस्तकांचा गठ्ठा धरून, ह्ळुहुळू डौलदार पावले टाकत चालते. काहीतरी तिच्यात बदलेले असत. पण काय? ते लक्षात येत नाही.

  August 2, 2019


लेखसंग्रह

कोंडुरा ….एक दिव्य अनुभव

Category:

 

त्या दिवशी मोठ्या रिक्षाने शिरोड्याहुन सकाळी निघायलाच नऊ वाजून गेले आणि वाटेत देव वेतोबा ..माऊली चं दर्शन घेऊन परुळे करीत भोगव्याला पोचायला जवळ जवळ दुपारचे बारा वाजले …. मी फार अस्वस्थ झालो .. कारण हा किनारा फार सुंदर आणि इथून दिसणारी विशाल समुद्राची निळाई …

  August 2, 2019


एका आठवड्यात २ किलो वजन कमी करा
लेखसंग्रह

एका आठवड्यात २ किलो वजन कमी करा

Category:

 

ज्यांना वजन घटवण्याची आवश्यकता आहे अशांनी रेग्युलर व्यायाम आणि नियंत्रित आहाराचे नियम काटेकोर पाळले तर आठवडय़ात एक ते दोन किलो वजन सहज घटवू शकाल.

  August 2, 2019