प्रभात’ चा ‘रामशास्त्री प्रभुणे’ प्रदर्शित – ३० जून १९४४
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानआज दिनांक ३० जून. ‘प्रभात फिल्म कंपनी’ च्या ‘रामशास्त्री प्रभुणे’ या चित्रपटास प्रदर्शित होऊन ७७ वर्षं पूर्ण होऊन ७८ वे वर्ष लागलं.
June 30, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानआज दिनांक ३० जून. ‘प्रभात फिल्म कंपनी’ च्या ‘रामशास्त्री प्रभुणे’ या चित्रपटास प्रदर्शित होऊन ७७ वर्षं पूर्ण होऊन ७८ वे वर्ष लागलं.
June 30, 2021
Category:
साहित्य - ललितएक अत्यंत नितांत सुंदर भावना शब्दबद्ध करणं हे खूपच अवघड काम पण पाडगावकरांनी ते लीलया पार पाडले. खळेंसारख्या श्रेष्ठ संगीतकाराने आपल्या चालीने आणि संगीताने त्यात आणखी गहिरे रंग भरले. आणि लताने ती आर्तता, लीनता, अत्यंत संयमित, संतुलित आणि शांत स्निग्ध स्वरात परीपक्वपणे मांडली. या गाण्यातील शब्दाशब्दांचे विवेचन आमच्या मैत्रिणीने तितक्याच तोलामोलाने सिद्ध केले -अभिनिवेश न आणता !
June 29, 2021
Category:
साहित्य - ललितअसंख्य डायऱ्यांचा ढीग तिथे होता. नेहमीप्रमाणे विस्कटलेली पाने पडली होती. आश्चर्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पेनं, पेन्सिली, बोरू, टाक, असंख्य रिफिल्स आणि शाईच्या दौती पण पडलेल्या होत्या. बाजूला तराजू मोडून पडला होता आणि हे सगळं एका कचरा कुंडीजवळ पडलं होतं. चमत्कारिक दृश्य दिसत होतं ते. मी सगळ्या डायऱ्या एकत्र केल्या, पानं एकत्र केली आणि वाचू लागलो.
June 29, 2021
Category:
अवर्गिकृतसत्तावीस वर्षीय इलेक्ट्रिक ऑफिसर डेक वर असणारी लाईट दुरुस्त करत होता उंची जास्त नसल्याने सेफ्टी बेल्ट आणि हार्नेस न लावता तो छोटयाशा शिडीवर उभा राहून काम करत होता. मेन डेकवर शिप साईड जवळची लाईट असल्याने शॉक लागल्या बरोबर त्याचा तोल गेला आणि तो समुद्रात पडला.
June 29, 2021
Category:
साहित्य - ललितशहरातील गेल्या रविवारचीच घटना आहे. उच्चभ्रू सोसायटीतील एक बंगला. बंगल्यात तिघेचजण रहाणारे. ऐंशीच्या घरातील पती-पत्नी व त्यांचा केअरटेकर. रात्री साडेआठची वेळ. तीन चोर बंगल्याजवळ येऊन कानोसा घेऊ लागले. त्या केअरटेकरने किचनच्या खिडकीतून त्यांना हटकले. तरीदेखील त्यांनी आत प्रवेश केलाच.
June 29, 2021
Category:
अवर्गिकृतजहाज गल्फ मध्ये ओमान च्या किनाऱ्याजवळ अँकर टाकून उभे होते. इंजिन रूम मध्ये तापमान बेचाळीस अंश पेक्षा जास्त होते सी वॉटर टेम्परेचर वाढल्यामुळे जनरेटर चा लुब ऑइल टेम्परेचर हाय अलार्म येत होता. जहाज गल्फच्या बाहेर पडे पर्यंत गर्मीत जास्त काम काढू नका आणि करू पण नका अशी सूट चीफ इंजिनियरने सगळ्यांनाच देऊन ठेवली होती.
June 28, 2021
Category:
लेखसंग्रहभारतीय निवडणुक आयोगाने राजकीय पक्षांशी सल्ला मसलत करून निवडणुक जाहिरनाम्यांबद्दल काही दिशानिर्देश जाहीर केले होते परंतु आयोगाने ह्या गोष्टीची नोंद घेतली नाही की मतदाराला निवडणुक जाहीरनाम्यांतील त्या आश्वासनांचे पुढे काय झाले हे जाणण्याचा अधिकार असणे आवश्यक आहे. पुढील निवडणुक होण्याआधी राजकीय पक्षाने किंवा उमेद्वाराने त्याच्या मागच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांचे नक्की काय झाले हे उघड न केल्याने मतदार त्याच्या माहिती मिळवण्याच्या हक्कापासून वंचित राहतो व त्याची योग्य निर्णय घेण्याची क्षमता हिरावून घेतली जाते.
June 28, 2021
Category:
साहित्य - ललितगावी जवळपासच्या घरात शेळ्या असायच्याच. त्यांची काळी कुळकुळीत दोन चार करडं (लहान पिल्लं) आपल्या आईच्या आसपास एकाच वेळी चारही पाय वरती घेऊन उड्या मारताना दिसायची. त्यांना पकडून त्यांच्या लोंबणाऱ्या, रेशमी मुलायम कानांना स्पर्श करताना आनंद मिळत असे. त्या करडांना पकडले की, शेळी डोळे मोठे करुन माझ्या ‘जगावेगळ्या’ कृतीकडे पहात रहायची.
June 28, 2021
Category:
साहित्य - ललितराहुल टॉकीजला ग्रेगरी पेकचा ‘मेकॅनाज गोल्ड’ चित्रपट एकदा पाहून समाधान झालं नाही, म्हणून पुन्हा पाहिला. मग तसेच काऊबॉईजच्या पठडीतले, ‘वन्स अपॉन टाईम इन द वेस्ट’, ‘रेडसन’, ‘मॅग्निफिशियंट सेव्हन’ ‘रिव्हेंज’ असे चित्रपट पाहिले. क्लींट इस्टवुड, बड स्पेनर, स्पेन्सर ट्रेसी या त्रिकूटाचे अनेक चित्रपट पाहिले. संपूर्ण जगाला कुंग फू कराटेचे वेड लावलेल्या ब्रुस ली चा ‘एन्टर द ड्रॅगन’ राहुलमध्येच ब्लॅकने तिकीट घेऊन पाहिला.
June 27, 2021
Category:
साहित्य - ललितनवकथा लेखकामध्ये ज्यांनी पन्नाशीच्या दशकात मराठी कथेला वेगळ वळण दिलं त्या लेखकांच्या नामावलीत व्यंकटेश माडगुळकर याचं नाव अग्रस्थानी आहे. किंबहुना ना.सी. फडके यांच्या चाकोरीबद्ध प्रेमाच्या आणि वि.स.खांडेकर यांच्या ध्येयवादी नायकांच्या कथांमध्ये अडकलेल्या मराठी कथेला वेगळ रूप दिलं. मराठी कथेला सामान्याची कथा बनवली
June 27, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti