बाळक्रीडा अभंग क्र.४२

बाळक्रीडा अभंग क्र.४२

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.



काळयाचे मागे चेंडु पत्‍नीपाशी । तेजःपुंज राशी देखियेला ॥१॥
लावण्यपूतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥२॥
उगवला खांब कर्दळीचा गाभा । ब्रीदे वांकी नभा देखे पायी ॥३॥
पाहिला सकळ तिने न्याहाळूनि । कोण या जननी विसंबली ॥४॥
विसरु हा तीस कैसा याचा जाला । जीवाहुनि वाल्हा दिसतसे ॥५॥
दिसतसे रूप गोजिरे लहान । पाहाता लोचन सुखावले ॥६॥
पाहिले परतोनि काळा दुष्टाकडे । मग म्हणे कुडे जाले आता ॥७॥
आता उठोनियां खाईल या बाळा । देईल वेल्हाळा माय जीव ॥८॥
जीव याचा कैसा वाचे म्हणे नारी । मोहिली अंतरी हरिरूपे ॥९॥
रूपे अनंताची अनंत अपार । न कळे साचार तुका म्हणे ॥१०॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||

Author