काय आतां यासि म्हणावे लेकरू । जगाचा हा गुरु मायबाप ॥१॥
माया याची यासि राहिली लपून । कळो नये क्षण एक होता ॥२॥
क्षण एक होता विसरली त्यासी । माझे माझे ऐसे करी बाळा ॥३॥
करी कवतुक कळो नेदी कोणा । योजूनि कारणा तेचि खेळे ॥४॥
ते सुख लुटिले घरिचिया घरी । तुका म्हणे परी आपुलाल्या ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
बाळक्रीडा अभंग क्र.३३
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.