असे शिक्षक- अशा शाळा

अनेक शिक्षक, शाळा, आज ‘सृजनात्मकतेकडे वाटचाल करत आहेत. नावीन्यशील प्रयोगामुळे शिक्षणक्षेत्रात आशाादयक चित्र निर्माण होत आहे. असेच एक शिक्षक आहेत श्री. बालाजी जाधव. आठवणीतील शिक्षक आणि शाळा ही जगण्याची ऊर्मी असते. जसे शिक्षक तंशी शाळा. As is the H.M., so is the school. शिक्षकामुळे शाळा लक्षात राहतात. दुर्गम, दुष्काळी भागात राहून शाळेला बागायती करणारे, नंदनवन करणारे शिक्षक श्री. बालाजी जाधव, गुगल इन्नोव्हेटर शिक्षक. ॲप्स, वेब स्वनिर्मित करुन गुगल मायक्रोसॉफ्टकडून सन्मान. गुगलसोबत दोनशेहून जास्त कार्यशाळा घेऊन दोन लाखाहून जास्त शिक्षक प्रवाहात आणले. शाळा ५० पेक्षा जास्त देशासोबत व्हर्चुअली जोडली आहे. ‘शिक्षणभक्ती’ हे युट्युब चॅनेल आहे. गुगल मायक्रोसॉफ्ट, एक्सेल गुजरात सरकारकडून आयसिटी वर्कबद्दल सन्मान. महाराष्ट्र ई-गव्हर्नमेंट आयटी सेलचे सदस्य. एससीईआरटीचे टेक्नो रिसोर्स पर्सन. कार्यप्रेरणा साधन व्यक्ती. बालभारती ॲप क्रिएशन सदस्य १५ देशात व्हर्चुअल ऑफलाईन, २५ अँड्रॉइड अॅप्लिकेशन केले. शाळेसाठी एसएमएस चॅनल केले. स्पर्धा परीक्षेसाठी ५०० फ्री ऑनलाइन टेस्ट. ओपेन सोर्स टूल फॉर ऑनलाइन टेस्ट. व्हिडिओज, अॅप्स गृहपाठचा वापर लाखो विद्यार्थी करतात. शाळेत लॅपटॉप स्वतः आणला, गैरहजर मुलेही यायला लागली. सुरुवातीला फ्फक्त तेवीस विद्यार्थी येत होते. त्यापैकी १२ विद्यार्थी हजर असायचे. मुलं गावात भटकत असायची. मुलांची आवड जपण्यासाठी स्वतः लॅपटॉप घेतला.

मुलांना टी. व्ही. चे कार्यक्रम, कार्टून पाहायला आवडतात.

सुरुवातीला टी.व्ही. पाहू दिला, त्यांचे कार्यक्रम बघू दिले. नर्सरी, गाणी, गेम बघू दिले. प्रत्येकाला लॅपटॉप हाताळू दिला. हजर मुलांनी गैरहजर मुलांना सांगितल्यावर तेही शाळेत येऊ लागले.

अशा रीतीने मुलांना ऑनलाइन वर्डची ओळख करुन दिली. मुले शाळेत येऊ लागली. अभ्यासक्रमाशी संबंधित व्हिडिओ डाऊनलोड केले. प्रश्नपेढी तयार केली. आधी, स्कॉलरशिपमध्ये यश येत नव्हते. नंतर सलग सात वर्षे स्कॉलरशिप मिळत गेली. प्रश्नावली सर्व बीटमध्ये फिरवण्यात आली. ६० शाळेतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळू लागली. शाळेत ५० विद्यार्थी झाले, जवळचे इंग्लिश मिडीयमचे विद्यार्थीही येऊ लागले. ब्लॉग लेखन शिकून घेतले. २०१० मध्ये ‘शिक्षणभक्ती’ युट्यूब चॅनेल सुरु केले.
अभ्यासक्रम मनोरंजक करणे, काही प्रकल्प सुचवणे, त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाशी संबंधित, स्कॉलरशिपसाठी काही प्रश्नावल्या तयार केल्या. ब्लॉगलाही चांगला प्रतिसाद मिळत गेला. प्रश्नावली ऑनलाइन उपलब्ध केल्या, शिक्षकांना आनंदाचा खजिनाच सापडला. बारा हजार शाळा रोज वेबसाईटला भेट देऊ लागल्या. ग्रामीण भागात वीज नसल्यामुळे फ्लॅश सॉफ्टवेअरचा वापर करुन ऑफलाइन टेस्ट उपलब्ध केल्या. ज्या अँड्रॉइड मोबाईलवरही वापरता येतात. २०१४ पासून या ऑफलाइन अॅपला राज्यभर प्रतिसाद मिळाला व ब्लॉगला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून बेस्ट वेबसाईट ॲवॉर्ड मिळाले. प्रत्येक वर्षी गुगलकडून पाच सप्टेंबरला चार शिक्षकांची भारतातून निवड होते. २०१४ मध्ये चार पैकी निवड झाली, बाकी तीन आयआयटी व मोठ्या शहरातले होते. त्यात जिल्हा परिषद शाळेच्या बालाजी जाधव यांनाही हा मान मिळाला. कला, हस्तोद्योग, गेम, संगीत याचे व्हिडिओज् डाऊनलोड केले. मुले स्पर्धेत नृत्यात भाग घेऊ लागली. युट्यूबवर जगाची सफर करु लागली. प्रधान सचिव यांनी शिक्षाकंचा एक गट निर्माण केला. जे तंत्रज्ञानाचा वापर व प्रयोग करीत असत. असा एक टेक्नोसॅव्ही गट आज कार्यरत आहे.

यात कल्पनांचे आदान प्रदान केले जाते. २०१४ पासून राज्य सरकारच्या वतीने १२० कार्यशाळा शिक्षक व शिक्षण अधिकारी यांच्यासाठी घेतल्या. यात स्वतःचे व्हिडिओ तयार करणे, अपलोड करणे याची माहिती दिली. गुगलचा वापर करुन भूगोल शिकवण्यात आला. नकाशा ऐवजी, हिमालय, ताजमहालची सफर ग्रामीण मुलांना घडवून आणली. या कामाची नोंद घेऊन गुगलने सर्टिफाईड टीचर प्रमाणपत्र दिले. जे शिक्षक अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करतात त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात येते. पालकांना एसएमएसद्वारे गृहपाठ पाठवणे सुरु केले. यामुळे पालक व शिक्षक यांच्यात सुसंवाद घडला. विजयनगर माण तालुक्यातील १००% टॅबयुक्त पहिली शाळा ठरली आहे. विजयनगर शाळेची मुले झाली टॅब सम्राट.गुजरातच्या अतुल फाऊंडेशनने १००% विद्यार्थ्यांना टॅब दिले. प्रत्येक मुलगा स्वतः आता त्याच्या सहाय्याने जगभरातील कोणत्याही शाळेसोबत कनेक्ट होऊ शकतो. ग्रामीण भागात ग्लोबल एज्युकेशन शक्य केले. Smart Class Teacher Mo National Award प्राप्त हे सगळं बारा वर्षाच्या सेवा काळातच केलं. पालकांच्या गावीही नसलेल्या गोष्टी जेव्हा शिक्षक करतात तेव्हा शाळेचा गुलमोहोर होतो. शिक्षक हे आठवणींच्या कुपीत ठेवणारं अत्तर आहे. ध्यास असेल तर परिवर्तन नक्कीच होतं.

Author