सुलोचना दीदी अभिवादन
इतर मराठी व्हिडिओज

सुलोचना दीदी अभिवादन

Category:

 

पडद्यावरचीच ओळख असलेल्या दीदींना प्रत्यक्ष भेटण्याची वेळ आली ती 1988च्या सुमारास. तेव्हा आम्ही कलासरगम तर्फे ‘वसंतबहार’ या कार्यक्रमाची आखणी करीत होतो. तीन वसंतांपैकी स्व.वसंत प्रभूंचा सगळा तपशील जनकवी पी. सावळाराम आणि प्रभू कुटुंबीय यांच्याकडून थेट उपलब्ध होता.

  February 13, 2026


किशोरताई सांगीतिक संवाद – भाग ६
इतर मराठी व्हिडिओज

किशोरताई सांगीतिक संवाद – भाग ६

Category:

 

शास्त्रीय संगीत शिकवणारी महाविद्यालये किंवा संगीत शिक्षण संस्था यापेक्षा गुरुपरंपरा का महत्त्वाची?, गुरु म्हणजे काय?, शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या शिष्यांनी कसलं भान ठेवलं पाहिजे? याविषयी ताईंनी व्यक्त केलेले विचार आजच्या भागात ऐकू या.

  February 13, 2026


किशोरीताई सांगीतिक संवाद – भाग ५
इतर मराठी व्हिडिओज

किशोरीताई सांगीतिक संवाद – भाग ५

Category:

 

किशोरीताईंच्या गाण्याला एक अध्यात्मिक बैठक होती. रागाच्या साधनेत मिळालेली स्वरानुभूती आपल्या गाण्यातून रसिकांनाही मिळावी, यासाठी त्या आटोकाट प्रयत्न करीत. अनेकांना त्यांचं गायन पारलौकिक वाटे. पण त्याचबरोबर लौकिक विश्वात काही गैरसमजही होते. यासंदर्भात जाणून घेताना शशी व्यास, अश्विनी भिडे, परवीन सुलताना यांच्या प्रतिक्रिया आजच्या भागात पाहूया.

  February 13, 2026


किशोरीताई सांगीतिक संवाद – भाग ४
इतर मराठी व्हिडिओज

किशोरीताई सांगीतिक संवाद – भाग ४

Category:

 

शास्त्रीय संगीत हे भावसंगीतच आहे’, असं आग्रही प्रतिपादन किशोरीताई नेहमी करीत आणि त्यांच्या मैफिलीतून रसिकांना त्याची प्रचितीही येत असे. स्वरभाषा, राग, रागाचं वातावरण, रागभाव या संकल्पना स्पष्ट करत किशोरीताईंनी, त्यांचे ‘तेच’ राग दरवेळी वेगवेगळा अनुभव का देत असतील, याची मीमांसा केली. सोबतच आजच्या भागात, नाना पाटेकर ताईंच्या गाण्याकडे कसं बघतात तेही पाहू.

  February 13, 2026


किशोरताई सांगीतिक संवाद – भाग ३
इतर मराठी व्हिडिओज

किशोरताई सांगीतिक संवाद – भाग ३

Category:

 

किशोरीताईंची सांगीतिक जडणघडण कशी झाली, विशेषतः गळ्यावर सुरांचे संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी काय केले, विविध वाद्यातून येणारे सूर कंठस्थ करण्यासह राग आणि वाद्य यांच्या संबंधाबाबत त्यांची मतं आज ऐकुया…..

  February 13, 2026


किशोरी ताई सांगीतिक संवाद – भाग २
इतर मराठी व्हिडिओज

किशोरी ताई सांगीतिक संवाद – भाग २

Category:

 

किशोरीताईंनी संगीताच्या सर्व प्रकारावर प्रभुत्व मिळवले होते. शास्त्रीय गायन आणि सुगम गायन यातला नेमका फरक स्पष्ट करत पार्श्वगायनाकडे त्यांनी का पाठ फिरवली, हे ही त्यांनी सांगितलं. किशोरीताईंच्या अंगी असलेल्या नाना कलांचा वेध तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी घेतला आहे…

  February 13, 2026


किशोरीताई सांगीतिक संवाद –  भाग १
इतर मराठी व्हिडिओज

किशोरीताई सांगीतिक संवाद – भाग १

Category:

 

दि. ३ एप्रिल, हा गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा स्मृतिदिन. महाराष्ट्र शासनाने पहिला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार किशोरीताईंनाच प्रदान केला होता. त्या सोहळ्यात किशोरीताईंची एक मुलाखतही झाली होती. अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून किशोरीताईंच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्याच पण अनेकांनी दृकश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

  February 13, 2026


इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा

Category:

 

दि. 9 ऑगस्ट क्रांतिदिनापासुन सुरु झालेली ही यू-ट्यूब मालिका, आज प्रजासत्ताक भारताच्या घटना समितीपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची नियुक्ती झाल्यादिनी म्हणजेच दि.29 ऑगस्ट रोजी लोकार्पित करीत आहोत. अमृतमहोत्सवी वर्षात विषयानुरूप अनेक उपक्रम करणं शक्य आहे. क्रांतिकथाकथन स्पर्धा, क्रांतिगीतगायन स्पर्धा, देशभावना वाढीस लागेल, या दृष्टीनं स्वतंत्र साहित्यनिर्मिती आणि कलाविष्कार शक्य आहेत. महाराष्ट्राला पोवाड्याची मोठी परंपरा आहे पण काही अपवाद वगळता शिवकाळातच रमलेल्या शाहिरांना अमृतमहोत्सवनिमित्त क्रांतिकारकाच्या कार्यावरचे उत्तम पोवाडे लिहीण्यासाठी प्रवृत्त करता येईल.

  February 13, 2026


क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १९- सूर्यसेन आणि सुभाषबाबू
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १९- सूर्यसेन आणि सुभाषबाबू

Category:

 

भारतीय स्वातंत्र्यलढयातल्या क्रांतीच्या तिसऱ्या पर्वाचे बिनीचे शिलेदार होते सूर्यसेन….या पर्वात सर्वात दुर्घर्ष रणधुमाळी माजली 18 एप्रिल 1930 रोजी! सूर्यसेन यांनी चटगाव चक्क स्वतंत्र करून सोडलं! दुसरं महायुद्ध पेटलं! गुलाम भारताला स्वतंत्र होण्याची दुसरी संधी आली.

  February 13, 2026


क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग २०
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग २०

Category:

 

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. स्त्रियांसाठी रानी ऑफ झांसी रेजिमेंट उभारलं. दि. 24 ऑक्टोबर 1943 दुपारी सव्वाबारा वाजता अस्थायी आझाद हिंद सरकारच्या स्थापनेची घोषणा प्रथम राष्ट्रपती सुभाषबाबूंनी केली. दोन महिन्यात 30 डिसेंबरला अंदमान ताब्यात घेतलं! त्यानंतर अंदमान-निकोबार ते मणिपूर, इम्फालपर्यंत आझाद हिंद फौज विजयाचे ध्वज रोवीत सरसावली.

  February 13, 2026