क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १८ – सूर्यसेन
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १८ – सूर्यसेन

Category:

 

क्रांतिकारकांचे तुकडे केल्याने क्रांती नष्ट होत नाही, याचा दाखला दिला बंगाली शेरांनी. क्रांतीचं तिसरं पर्वही बंगालातच तेव्हा सुरू झालं, जेव्हा संपूर्ण चटग्राम शहर क्रांतिकारकांनी जिंकून अस्थायी भारत सरकारची स्थापना केली. सुभाषचंद्रांनी जे स्वयंसेवकांचे जंगी पथक उभारले होते, त्यातूनच‘’बंगाल व्हॉलेंटियर्स’ या क्रांतिदलाचा उदय झाला.

विनयचंद्र बोस यांन बंगालचं सचिवालायच ताब्यात घेण्यासाठी आक्रमण केलं त्या कहाणीसह महिला क्रांतिकारकांची माहिती या भागात घेऊया. सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मिडिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’

सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.
मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.

क्रांतिवीरांची अमृतगाथा- भाग १७ – भगतसिंग
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा- भाग १७ – भगतसिंग

Category:

 

भगतसिंगाचे हौतात्म्यवेड तर पराकोटीला गेलेलं होतं! संसदभवनात बॉम्ब फेकून स्वतःहून साखळदंड पेहेरून घेतले होते त्याने! कारागृहात जगन्मातेशी स्वरचित कवितेतून त्याने अहोरात्र आळवणी चालवली होती ’मेरा रंग दे बसंती चोला…..भगतसिंग तसा इतर क्रांतिवीरांच्या तुलनेत सुदैवी ठरला. कारण त्याचं  नाव माहीत नाही असा कोणी भारतीय आज सापडणार नाही.

क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग १६ चंद्रशेखर आझाद
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग १६ चंद्रशेखर आझाद

Category:

 

भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या क्रांतीच्या महाभारतात अभिमन्यूच्या शर्थिने लढून शहीद झालेल्या सच्चरित्र व चतुरस्र ’चेतनाशक्तीचं नाव आहे चंद्रशेखर आझाद. दि. 27 फेब्रुवारी 1931 या दिवशी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध जो घनघोर रणसंग्राम केला त्याला तोड नाही.

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १५ – चंद्रशेखर आझाद.
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १५ – चंद्रशेखर आझाद.

Category:

 

अंदमानातून परतलेल्या शचिन्दनाथ सान्यालांनी उत्तर प्रदेशात हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी नावाची क्रांतिफौज खडी केली. रामप्रसाद बिस्मिलच्या नेतृत्वात फक्त दहा क्रांतिकारकांनी काकोरी स्थानकापाशी एक रेल्वेगाडी रोखून 17 हजारांचा सरकारी ऐवज लुटला. काकोरी कटात झाडून सारे धरले गेले.

क्रांतिवीरांची अमृतगाथा भाग १४-क्रांतीसिंह नाना पाटील
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा भाग १४-क्रांतीसिंह नाना पाटील

Category:

 

महात्मा गांधीजीच्या चलेजाव चळवळी नंतरच्या काळात ब्रिटीश सरकारला समांतर अशी यंत्रणा महाराष्ट्राच्या काही भागात उभी करताना क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्वयंपूर्ण कारभाराचं सूत्र पुढे आणलं. त्यासाठी ग्रामीण भागातल्या बहुजन समाजात स्वाभिमान जागृतीचं काम त्यांनी निष्ठेनं आणि अथकपणे केलं. ‘स्वातंत्र्यचळवळीत सर्वसामान्यांचं योगदान’  हीच त्यांची भूमिका होती. परिणामी ‘प्रतिसरकार’ ही संकल्पना अस्तित्वात आली.

क्रांतिवीरांची अमृतगाथा’-भाग १३ महात्मा गांधी
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा’-भाग १३ महात्मा गांधी

Category:

 

महात्मा गांधी भारताला लढाया, हिंसाचार,आक्रमण, युद्धांचा फार मोठा इतिहास आहे. पण याच देशात शस्त्राविना स्वातंत्र्ययुद्ध लढलं जाऊ शकतं आणि जिंकताही येतं, हे दाखवून दिलं महात्मा गांधींनी. म्हणूनच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अहिंसक क्रांतीचे जनक असलेल्या या राष्ट्रपित्याला वंदन करताना ऊर अभिमानानं भरून येतो.

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १२- अल्लुरी सीताराम राजू
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १२- अल्लुरी सीताराम राजू

Category:

 

न्याय आणि माणुसकीला काळिमा फासणार्‍या जलियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकमान्य टिळकांचं देहावसान झालं. क्रांतिकारकांचा महान मंत्रगुरू मरण पावला.

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग ११
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग ११

Category:

 

बागा जतीन, जलीयनवाला बाग रणांगणात, युद्धाच्या पवित्र्यात पाय रोवून उभं ठाकणं हे क्रांतीचं दुसरं पर्व ‘गदर’द्वाराच सुरू व्हायला हवं होतं, पण ते सुरू झालं गदरनंतर ओरिसात ! जुलमी राजसत्तेला डिवचून भूमिगत होण्याऐवजी मुखोमुखी लढा देण्याची सुरुवात केली – बाघा जतीन ऊर्फ जतीन्द्रनाथ मुखोपाध्याय यांन ! बाघा जतीन यांनी ब्रिटीश सैन्यांशी हातघाईची लढाईच लढली.

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १०
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १०

Category:

 

छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राला वारसा लाभला आहे तो शौर्याचा, पराक्रमाचा आणि देशप्रेमाचा. देव, देश आणि धर्मासाठी तळहातावर प्राण घेऊन लढणाऱया शूरवीरांची ही भूमी. या भूमीत जन्माला आलेल्या अनेक वीरांनी १८५७च्या ही आधी जुलमी ब्रिटीशांविरुद्ध सशस्त्र लढे दिले होते.

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग ९
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग ९

Category:

 

१९१० पर्यंत भारताच्या स्वातंत्र्य चळवळीन उग्र रूप धारण केलं होत, मृत्यूचं भय भेदून झुंज घेणार्‍या वंग युवकांमुळेच सरकारला कलकत्त्यातला बाडबिस्तरा गुंडाळावा लागला. सरकारनं राजधानी कलकत्याहून दिल्लीला आणायचं ठरविलं. पण राशबिहारी बोस सरकारच्या पाठोपाठ दिल्लीत येऊन दाखल झाले.