गुरु-शिष्य परंपरेवर व्याख्यान- भाग २
इतर मराठी व्हिडिओज

गुरु-शिष्य परंपरेवर व्याख्यान- भाग २

Category:

 

आज गुरुपौर्णिमा ! ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी आपल्या एका व्याख्यानात ‘गुरु कसा असावा? शिष्य कसा असावा? गुरुकृपा कुणाला प्राप्त होते’ याचे केलेले विवेचन आजच्या दुस-या भागात ऐकुया

  February 13, 2026


दाजी पणशीकर- गुरु शिष्य परंपरा- भाग १
इतर मराठी व्हिडिओज

दाजी पणशीकर- गुरु शिष्य परंपरा- भाग १

Category:

 

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी नृत्यगुरु सोनिया परचुरे यांच्या विद्यार्थ्यांसमोर गुरुपरंपरेबाबत विचार मांडले. त्या व्याख्यानाचा पहिला भाग आज गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपल्यासमोर प्रसारित करीत आहोत.

  February 13, 2026


पारंपरिक मराठी लावणी-भाग २
इतर मराठी व्हिडिओज

पारंपरिक मराठी लावणी-भाग २

Category:

 

तमाशाच्या बि-हाडीच वाढलेल्या आणि वयात आलेल्या एका तरुणीला आडाच्या पाण्याच्या रूपकातून धोक्याची जाणीव करून देणारी ही पारंपरिक लावणी. तमाशातल्या दहा वर्षाच्या मुलींचं त्यावेळच जीवन, भवताल याचं चित्रण असलेली ही लावणी नृत्याबरोबरच अभिनयासाठी देखील अतिशय अनुकूल आहे.

  February 13, 2026


पारंपरिक मराठी लावणी – भाग १
इतर मराठी व्हिडिओज

पारंपरिक मराठी लावणी – भाग १

Category:

 

पाऊस सुरू झाला आणि काही वर्षांपूर्वी मी केलेला वर्षालावणीमहोत्सव आठवला. लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान असं आपण म्हणतो खरं, पण आजची महाराष्ट्राची लावणी मराठीजनांनी अभिमानाने मिरवावी, अशी राहिली आहे का? लावणीतला घरंदाजपणा, कलात्मकता जाऊन आता काही कलाकार तिचं स्वरूप निव्वळ उथळ आणि स्पष्टच सांगायचं तर ‘बार डान्सिंग’च्या दर्जाचं करत आहेत. परंपरेतली लुप्त होत असलेली लावणी माहीत असलेले कलाकारही आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच राहिले आहेत.

  February 13, 2026


रंग श्रीमंत – भालचंद्र पेंढारकर भाग – २
इतर मराठी व्हिडिओज

रंग श्रीमंत – भालचंद्र पेंढारकर भाग – २

Category:

 

दाजी पणशीकर… ज्येष्ठ विचारवंत, रामायण, महाभारत, संतवांग्मय यांचे अभ्यासक, परखड विचार मांडणारे व्याख्याते आणि ग्रंथ लेखक ही त्यांची ओळख आहे पण दाजी पणशीकर यांनी आपले मोठे बंधू नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या ‘नाट्यसंपदा’ या संस्थेचे सूत्रधार म्हणून बावीस वर्षे व्यवस्थापन केले, हे काही जणांना माहीत नसेल.

  February 13, 2026


रंग श्रीमंत – भालचंद्र पेंढारकर भाग – १
इतर मराठी व्हिडिओज

रंग श्रीमंत – भालचंद्र पेंढारकर भाग – १

Category:

 

मराठी रंगभूमीला ‘श्रीमंत’ करण्यात ज्या कलाकार आणि साहित्यिकांनी महत्त्वाचे योगदान दिले, त्यांच्या कार्याची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर हे ‘रंगश्रीमंत’ व्याख्यानमाला देत आहेत आणि हा ठेवा आम्ही ‘युट्यूब’च्या
माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवत आहोत.

  February 13, 2026


रामकृष्ण नायक अभिवादन
इतर मराठी व्हिडिओज

रामकृष्ण नायक अभिवादन

Category:

 

मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळात रायगडाला जेव्हा जाग येते, संगीत मत्स्यगंधा, लेकुरे उदंड जाहली, संध्याछाया, बॅरिस्टर, सूर्याची पिल्ले, नटसम्राट अशा अभिजात नाटकांची निर्मिती करणारी संस्था म्हणजे ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’. या संस्थेच्या माध्यमातून केवळ नाटक नव्हे तर इतरही सामाजिक उपक्रमात सहभागी असणारे आणि संस्थेच्या कला विभागाची धुरा 70 वर्षांहूनही दीर्घकाळ सांभाळणारे रामकृष्ण नायक यांचं काल निधन झालं.

  February 13, 2026


इतर मराठी व्हिडिओज

मैत्र हे शब्द सुरांचे

Category:

 

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा सर्वाधिक सहवास लाभलेल्या त्यांच्या ज्येष्ठ शिष्या नंदिनी बेडेकर यांनी ताईंच्या आठवणी, त्यांचे सांगीतिक विचार आणि त्यांच्याकडून मिळालेल्या गायकीचे दर्शन दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात सादर केले. त्या कार्यक्रमाची युट्युब लिंक आपल्या अवलोकनार्थ शेअर करीत आहोत.. जरूर आस्वाद घ्यावा, ही विनंती.

  February 13, 2026


राजा परांजपे अभिवादन – रमेश देव, सीमा आणि एक धागा सुखाचा भाग २
इतर मराठी व्हिडिओज

राजा परांजपे अभिवादन – रमेश देव, सीमा आणि एक धागा सुखाचा भाग २

Category:

 

सीमाताई, अर्थात चित्रपट अभिनेत्री सीमा देव यांच दुःखद निधन झालं. तशी ही बातमी अनपेक्षित नव्हती. कारण गेली अनेक वर्ष त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. रमेश देव गेले, ही संवेदना देखील त्यांच्यापर्यंत किती पोहोचली असेल, याची मला शंका आहे. असो…. कलाकार जातात, पण त्यांच्या स्मृती त्यांनी केलेल्या कामातून चिरंतन रहातात.

  February 13, 2026


श्रीकौपीनेश्वराष्टक (शिवस्तुती)
इतर मराठी व्हिडिओज

श्रीकौपीनेश्वराष्टक (शिवस्तुती)

Category:

 

भगवान श्रीशंकरांच्या स्वयंभू आणि पुरातन मंदिरांपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातल्या ठाणे नगरातील श्रीकौपीनेश्वर मंदिर. सुमारे हजार-बाराशे वर्ष पुरातन अशा या मंदिरातील शिवलिंग महाराष्ट्रातले सर्वात भव्य शिवलिंग मानले जाते.

  February 13, 2026