जोजाची गोष्ट
Category:
कथा बाल-साहित्य साहित्य - ललित‘जोजा ही एका राजाची मुलगी, पाय घसरून पडलेल्या एका म्हातारीला कुचेष्टेने हसली. तशी म्हातारीने चिडून शाप दिला: ‘तादेव’ नावाचा मृत राजपुत्र तुला पती मिळू दे अन् तुझे खूप हाल होऊ देत !’ बिचारी राजकन्या, तिने म्हातारीची विनवणी केली. तो मृत राजपुत्र कशाने उठेल म्हणून विचारले. तशी म्हातारीने सांगितले की, त्याच्या उशाशी थडग्यात एक मोठे चांदीचे पिंप ठेवलेले आहे, ते जी तरुणी तीन दिवसांत अश्रूंनी भरून टाकील तीच त्याला जीवदान देऊ शकेल व मग त्यांचे लग्न होईल.