लेखसंग्रह

प्लॅस्टिकबंदी

Category:

 

सरकारने ठरवले, न्यायालयाने मान्य केले आणि महाराष्ट्रात ‘प्लॅस्टिकबंदी’ लागू झाली. प्लॅस्टिक हाच पर्यावरणाचा सर्वांत मोठा शत्रू आहे आणि या प्लॅस्टिकबंदीमुळे पर्यावरणाचा हास आणि मुक्या जनावरांचा त्रास थांबणार, असे घोषित केले गेले. समुद्रातल्या प्रदूषणाला या बंदीमुळे आळा बसेल अशी खात्री दिली गेली. प्लॅस्टिकला पर्यावरणाचा गुन्हेगार ठरवल्यावर, प्लॅस्टिक वापरत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना त्या वापराबद्दल कायद्याने चक्क गुन्हेगार ठरवले गेले आणि त्यांच्यावर अतिरेकी दंड लादण्यात आला

लेखसंग्रह

आयुका आणि चार्ल्स कोरिया

Category:

 

जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांचे अलीकडेच निधन झाले. आयुका या विख्यात संस्थेची वास्तू ही चार्ल्स कोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आली. या निमित्ताने आयुकाचे संस्थापक-संचालक प्रा. जयंत नारळीकर यांचा चार्ल्स कोरिया यांच्याशी निकटचा संबंध आला प्रा. नारळीकरांनी लेखणीबद्ध केलेल्या, चार्ल्स कोरिया यांच्या या काही आठवणी.

लेखसंग्रह

इमारतींचे पाडकाम

Category:

 

एखाद्या प्रचंड आकाराच्या इमारतीची वा तत्सम बांधकामाची निर्मिती जशी आव्हानात्मक असते, तसेच त्या बांधकामाचे पाडकामही आव्हानात्मक असते. मोठे बांधकाम सुरक्षितपणे पाडताना, अनेक अडचणींवर मात तर करावी लागतेच; पण त्याचबरोबर पाडकाम करणाऱ्या तज्ज्ञांचे स्थापत्यशास्त्रातील ज्ञान, अनुभव, कौशल्य हे सर्वच पणास लागतात. अशी मोठी पाडकामे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींची ही ओळख…

लेखसंग्रह

कृत्रिम बुद्धिमत्ता: काल, आज आणि उद्या

Category:

 

१९५० साली मांडलेली कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आज प्रत्यक्षात आलेली दिसते. आपल्या हातातल्या भ्रमणध्वनीपासून ते मंगळावर जाणाऱ्या यानांपर्यंत आणि खेळ खेळणाऱ्या संगणकांपासून ते विनाचालक वाहनांपर्यंत आज सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता आपली अनिवार्यता पटवून देत आहे. विश्व व्यापून दशांगुळे उरणाऱ्या या कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास, प्रवास आणि भविष्याचा आढावा घेणारा हा लेख…

लेखसंग्रह

खगोल शास्त्र – राहू आणि केतूचे

Category:

 

लहानपणी मी समुद्र मंथनाची पौराणिक कथा वाचली होती. या कथे मध्ये जेव्हा समुद्रातून अमृताची प्राप्ती होते तेव्हा राक्षसांना अमृत प्राप्ती होऊ नये म्हणून भगवान विष्णू मोहिनीचे रूप धारण करून अमृत वाटप करण्याचे ठरवतात. हे वाटप करत असताना मोहिनी रुपात भगवान विष्णू प्रत्यक्षात देवांना खरे अमृत तर राक्षसांना अमृताच्या नावाने फक्त जल देत असतात.

लेखसंग्रह

देखभाल आणि आपत्कालीन यंत्रसामग्री

Category:

 

रेल्वेसेवा व्यवस्थित सुरू राहण्यासाठी तिची देखभाल ही अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यासाठी विशेष प्रकारची यंत्रे वापरावी लागतात. तसेच, अपघातासारख्या संकटकालीन परिस्थितीतसुद्धा विशेष प्रकारच्या सामग्रीचा वापर करावा लागतो. देखभालीसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीची ही ओळख…

लेखसंग्रह

पहिले विद्युत वाहन

Category:

 

पहिले व्यावहारिक विद्युत वाहन रॉबर्ट डेव्हिडसन याने इंग्लंडमध्ये १८३७ साली तयार केले. त्यानंतर पॅरिस येथील ऑम्नी बस कंपनीने १८८१ मध्ये पहिले सार्वजनिक विद्युत वाहन प्रचारात आणले. शिसे आणि विरळ सल्फ्युरिक आम्ल यांच्यामधील रासायनिक क्रियेवर कार्य करणाऱ्या विद्युत घटमालेवर चालणाऱ्या मोटारगाड्या व ट्रक्स अमेरिकेत १८८० नंतरच्या दशकात वापरात होत्या.

लेखसंग्रह

प्राचीन वृक्ष

Category:

 

वनस्पती अभ्यासकांच्या दृष्टीने वृक्षाचे वय हे अत्यंत महत्त्वाचे असते. वृक्षाचे वय हा फक्त एखाद्याच्या कुतूहलापुरता मर्यादित विषय नसून, सदर वृक्षाने वातावरणातले कोणते बदल अनुभवले आहेत, याचेही ते निदर्शक असते. वृक्षाचे वय काढण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात त्याचा आढावा घेणारा, तसेच आज अस्तित्वात असलेल्या विविध प्राचीन वृक्षांची ओळख करून देणारा हा लेख…

लेखसंग्रह

अंतराळवीरांचे पोशाख

Category:

 

अंतराळवीरांच्या गरजा या आवश्यकतेनुसार बदलत असतात. अंतराळयानात वावरतानाच्या गरजा वेगळ्या, तर अंतराळयानाच्या बाहेर पडल्यानंतरच्या गरजा वेगळ्या. या गरजांनुसारच त्यांच्या पोशाखात बदल होत असतो. अंतराळवीर वापरत असलेल्या या पोशाखांची ही ओळख…