जादू
लेखसंग्रह

जादू

Category:

 

आपल्या एकुलत्या एक लेकीचा पाचवा वाढदिवस त्याला अगदी जंगी साजरा करायचा होता. एका हॉल मध्ये सगळ्याचं कंत्राटच दिलं होतं. रंगीबेरंगी फुगे, कार्टूनची सजावट, एका कोपऱ्यात टॅटू काढणारा, एक जण वेगवेगळे मास्क वाटणारा वगैरे वगैरे जय्यत तयारी केली होती. हळूहळू पाहुणे येऊ लागले. भेटीगाठी-गप्पा सुरू झाल्या. थोड्यावेळाने बहुतांश निमंत्रित आले आणि त्याने तिथल्या व्यवस्थापन करणाऱ्याला कार्यक्रम सुरू करायला सांगितलं.

  March 17, 2023


लेखसंग्रह

चिक्कूची ‘बी’

Category:

 

फेसबुकवर आज एक पोस्ट वाचनात आली. निवृत्तीला आलेल्या एका गृहस्थांनी, निवृत्तीनंतर पत्नीसह स्वतंत्र राहण्यासाठी एक छोटा फ्लॅट घेऊन ठेवला होता. मुलाचं त्याच्या मैत्रिणीशी लग्न लावून दिल्यावर ते दोघे पती-पत्नी दोन्ही वेळच्या जेवणासाठी एकत्र येऊन नंतर आपल्या फ्लॅटमध्ये राहू लागले. त्यावर सुनेने विचारले, ‘मला सर्वजण नावं ठेवतील, माझ्या त्रासामुळे तुम्ही स्वतंत्र राहू लागलात म्हणून.

  March 16, 2023


लेखसंग्रह

साबणातील घटकद्रव्य

Category:

 

खेळून आल्यावर साबणाने हात-पाय स्वच्छ धू.’ असं संध्याकाळच्या वेळी प्रत्येक घरात आईचं हे वाक्य ऐकायला मिळतं. अस्वच्छ हात-पाय फक्त पाण्याने स्वच्छ होत नाहीत. त्यासाठी साबण वापरावा लागतो. कसं बरं तयार करतात साबण? अल्कली मोनोकार्बोक्सिलिक आम्ल (फॅटी अॅसिड) यामध्ये अभिक्रिया होऊन साबण आणि ग्लिसरीन तयार होतं.

  March 15, 2023


ममींची कार्यशाळा
लेखसंग्रह

ममींची कार्यशाळा

Category:

 

ममी हा इजिप्तच्या पुरातन इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. ममी म्हणजे इजिप्तच्या राजघराण्यातील, तसंच तिथल्या सधन लोकांची, प्रक्रियेद्वारे जतन करून ठेवलेली शवं. ममीद्वारे मृताचा अनंताकडचा प्रवास सुरू होत असल्याचं मानलं जायचं. त्यामुळे ममी ही अगदी रूढीपूर्वक तयार केली जायची.

  March 14, 2023


लेखसंग्रह

बेकेलाइट प्लास्टिक

Category:

 

प्लास्टिकला अगदी सहजगत्या पाहिजे तसा आकार देता येतो. ज्या वस्तूंना कमी-जास्त दाबाने अथवा उष्णता व दाब या दोन्हींच्या साहाय्याने हवा तो आकार प्राप्त करण्याचा गुणधर्म असतो ती वस्तू प्लास्टिक आहे असे समजतात. प्लास्टिकला अंग व मजबुती देण्याकरता रंगद्रव्य, पाणी व तंतूमय पदार्थ वापरतात. तथापि त्याला आकार देण्याचे व आकार धारण करण्याचे कार्य करणारा मुख्य घटक हा उच्च भाराचा कार्बनी पदार्थ असतो. या आकारी कार्बनी घटकाला अनेक वेळेला रेझिन असे म्हणतात.

  March 14, 2023


कथा

शोधा म्हणजे सापडेल!

Category:

 

“आई आता बास झालं हं तुमचं, चांगुलपणा शोधणं! प्रत्येक गोष्टीत चांगुलपणा पाहावा, चांगुलपणा शोधावा हे ऐकून ऐकून आम्ही कंटाळलो. आयुष्यभर चांगुलपणा शोधून तुम्हाला मिळालं काय, ते तरी कळू दे.” वृंदा चिडून चिडून बोलत होती आणि तितक्याच थंडगारपणाने त्यांनी उत्तर दिलं, “तुझ्यासारखी सून मिळाली.”

  March 14, 2023


साहित्य - ललित

मास्तर दत्ताराम – गोव्याचे भूषण

Category:

 

गोव्याने अनेक दिगग्ज कलाकार रंगभूमीला दिले आहेत.आपल्या कर्तृत्वाने तिथे आपले स्थान निर्माण केले असलेले एक म्हणजे मा दत्ताराम. एकदा का चेहऱ्याला रंग चढला कि ते त्या भूमिकेत शिरायचे, त्या रंगमंचाचे वातावरण जणू त्यांचा कायापालट करत. त्या नन्तर ते कधी रसिकांच्या मनावर अधिराज्य करत हे कुणालाच कळत नसे.

  March 13, 2023