No Picture
लेखसंग्रह

मुक्त विचार

Category:

 

मेंदूचा सक्रिय हिस्सा जेव्हा रिकामा असतो तेव्हा खूप काही नवं सुचतं, त्रास देणाऱ्या समस्यांची उत्तरे चुटकीसरशी मिळतात, शॉवर खाली असताना काहीतरी भन्नाट सुचून जातं. मानवी मेंदूची क्षमता अफाट असली तरी रोज जो अनावश्यक कचरा(क्लटर) आपण वेगवेगळ्या माध्यमांमधून त्यांत कोंबत असतो, ती केराची टोपली चालताना अंशतः रिकामी होते.

No Picture
लेखसंग्रह

दृष्टिकोन

Category:

 

आता मी सुद्धा माझा दृष्टिकोन बदलून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसा भाग घेता येईल  असे कार्यक्रम सादर करायचे ठरविले . विद्यार्थ्यांचा आनंद हाच तर माझा आनंद होता. मुलांच्या दृष्टिकोन जाणून घेतल्यामुळे मला  अनाकलनीय असं काहीतरी साध्य केल्याचा आनंद झाला.       

No Picture
लेखसंग्रह

नार्को ॲ‍नालिसिस

Category:

 

काही वर्षांपूर्वी ज्या चंद्राकडे लहान मुले आपला मामा म्हणून पाहत होती , त्याच चंद्रावर नंतर मानवाची पावले उमटली . नंतरची पिढी चंद्रावर वसाहत तयार करण्याचा विचार करू लागली . चंद्रावर पाणी आणि अन्य जीवनोपयोगी गोष्टींचा शोध घेऊ लागली . आता नवी पिढी चंद्रावर चक्क शेती करू पाहत आहे . होय ! विश्वास बसणार नाही ; पण हे खरे आहे.

No Picture
अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – ४५ -अन्नपूर्णा महाराणा

Category:

 

१९४२ सालचे चले जावं आंदोलन असो वा सविनय अवज्ञा अभियान अन्नपूर्णा महाराणांची कामगिरी वाखाणण्या सारखीच होती. ह्या सगळ्या काळात त्यांना अनेकदा जेल यात्रा करावी लागली. प्रत्येकवेळी कारावसातून मुक्त झाल्यावर त्यांचा इंग्रजद्वेष आणि देशप्रेम दुपटीने वाढत होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्या कटिबद्ध होत्या. वेग-वेगळ्या कॉन्ग्रेसच्या सभांना त्या आवर्जून उपस्थित राहत.

No Picture
साहित्य - ललित

दिग्दर्शकांचे ठाणे

Category:

 

लेखकाच्या कल्पनेमधून कागदावर उतरलेलं नाटक, प्रेक्षकांपर्यंत दृश्य स्वरूपात आणण्याची कामगिरी बजावण्याची जबाबदारी ज्याची असते आणि ही जबाबदारी निभावताना आपल्या प्रतिभेनं, कलाकारांच्या मदतीनं, तांत्रिक गोष्टींची मदत घेऊन जो नाटकात प्राण फुंकतो तो दिग्दर्शक. ठाण्याच्या रंगपरंपरेमध्ये दिग्दर्शकीय प्रतिभेनं स्वतचा स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या दिग्दर्शकांची संख्या कमी नाही. राज्य नाट्यस्पर्धांपासून ते व्यावसायिक रंगभूमीपर्यंत दिग्दर्शनाची जादू दाखवणाऱ्या ठाण्याच्या दिग्दर्शकांची गणनाच करायची झाली तर यशवंतराव पालवणकर यांच्यापासून सुरुवात करावी लागेल.

No Picture
लेखसंग्रह

सोलापूर फाइल्स – श्रवणानंदाच्या नोंदी !

Category:

 

एकुणातच साहित्यिक,सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे आजकाल जिकिरीचे झालंय. त्यातून फारसे काही हाती लागत नाही,हेही एक प्रमुख कारण असावे. पण काही योग कोणीतरी आपल्या वाटेवर आणून ठेवले असतात आणि आपण ते जगायचे असतात.