साहित्य - ललित

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ५

Category:

 

भान हरपून दृश्य बघत असताना पडदा बंद झाला. तशी भानावर आले. खूप वाईट वाटलं की बंद झालं का देऊळ. आईला दर्शन नाही होणार का? पण आता पालखी सोहळा होईल आणि मग परत पडदा उघडेल आणि सगळ्यांना दर्शन घेता येईल असे कळले. आता सभा मंडपात सभोवार नजर फिरली. बरीच लोकं होती तिथे. खाली बसून सोहळ्याचा आनंद आणि लाभ घेण्यासाठी जमले होते.

  May 8, 2022


कथा

पुलाखालची माणसं (कथा)

Category:

 

ही पुलाखालची माणसं मुंबईच भयावह चित्रण आहेत. कुठेतरी वाळवी लागली आहे. बाकी सर्व प्रश्न सुटू शकतात पण एकदा लागलेली ही वाळवी शहर आतून-बाहेरून पोखरून काढणार. वर्षा-दोन वर्षापूर्वी पुलाखाली माणसं नव्हती. आता कुठल्याही पुलाखाली जाऊन पाहा. नशेत बुडालेल्या केविलवाण्या चेहऱ्यांची ही कळकट-मळकट मंडळी जनावराच्या नजरेन तुमच्याकडे पाहतील.

  May 8, 2022


कथा

शिकारी क्वार्टरमेनची गोष्ट (संक्षिप्त रूपांतरीत कथा १८)

Category:

 

किंग सॉलोमन्स माईन्स हा चित्रपट अनेकांना ठाऊक असेल. ती कादंबरी आणि त्यावरील चित्रपट खूप गाजला.लेखक हॅगार्ड ह्यांनी स्वतः दीर्घकाळ आफ्रिकेत वास्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या कथा कादंबऱ्यांना वास्तवाचं रूप येत असे. प्रस्तुत कथा ही किंग सॉलोमन्स माईन्सची कथेची प्रस्तावनाच असल्यासारखी आहे. मूळ कथा ६५००हून अधिक शब्दांत आहे. मी ती २४६० शब्दांत मांडायचा प्रयत्न केला आहे. ब्रिटीश कसे साहसी होते व त्यांना त्या त्या देशांतील लोकांनी कशी साथ दिली, ह्याचाही प्रत्यय येतो. मागच्या वेळची कथा ही खोट्या शिकारीची होती तर ही खरोखरीच साहस आणि भय असलेली शिकारकथा आहे.

  May 8, 2022


व्यक्ती-परिचय

एल.पी उर्फ लक्ष्मीकांत

Category:

 

लक्ष्मीकांत यांचे पूर्ण नाव लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर. संगीत देणे हे त्यांनी व्यवसाय म्हणून स्विकारले होते आणि शेवटपर्यंत या व्यवसायाशी ते ईमानदार राहीले.

  May 7, 2022


कथा

नूतनीकरण

Category:

 

आठ-दहा दिवसांनंतरची गोष्ट. रविवारचा दिवस होता. मी दासबोधाचा क्लास संपवून घरी आले. दार उघडले तर समोरच एक मुलगा बसलेला होता. निळे जीन्स पँट आणि पिवळ्या-निळ्या चौकडीचा शर्ट त्याने घातलेला होता. पंख्याच्या वाऱ्याच्या झोताने हलके हलके उडणारे त्याचे सिल्की केस मस्त दिसत होते.

  May 7, 2022


लेखसंग्रह

हमने तुमको देखा

Category:

 

संपूर्ण “खेल खेल में ” महाविद्यालयीन जोशाने भरलेला ! हा, नीतू आणि राकेश रोशन – रॅगिंग , स्टेजवरील धमाका , थोडीशी रहस्य फोडणी , ” आजा मेरी बाहो में आ ” वाली अरुणा . बाहेर आलो तेव्हा खऱ्या अर्थाने तरुण झाल्यासारखं वाटलं.

  May 7, 2022


अलविदा’ नसलेली ‘एक्झिट’ !
लेखसंग्रह

अलविदा’ नसलेली ‘एक्झिट’ !

Category:

 

डोळ्यांनी बोलणारी फक्त दोन माणसं मला या चित्रपटसृष्टीत आवडली – एक तो “निळ्या डोळ्यांचा जादूगार “(राज कपूर )आणि दुसरा हा! मराठीतला आपला चपखल शब्द वापरायचा तर हा “भोकरडोळ्या ” होता. पण इतकी बोलकी नजर अपवादात्मक ! त्याचे सारे संवाद ओठातून नंतर उमटायचे पण ते काम आधी डोळ्यांनी केलेलं असायचं.

  May 7, 2022


कथा

स्टेशन चिरेबंदी (कथा)

Category:

 

अस्ताव्यस्त पसरलेल्या या स्टेशनवर किती प्लॅटफॉर्म आहेत हे स्टेशनमास्तरला सुद्धा सांगता येणार नाही. किती पूल आहेत तेही मोजावे लागतील. कुठल्या पुलावर चढल्यावर कुठल्या प्लॅटफॉर्मवर उतरता येईल ? कुठे जाता येईल ? सांगता येणार नाही. कोण कुठे अडवील समजणार नाही. गर्दीत काहीही स्वत:च डोक न चालवता चालत राहिलात तरच स्टेशनच्या बाहेर पडू शकाल.

  May 7, 2022