लेखसंग्रह

उपयुक्तता आणि सौदर्य ह्यांचा मिलाफ

Category:

 

गृह सजावटीसाठी उपयुक्तता आणि सौंदर्य यांची सांगड घालून संरचना करणं आवश्यक असतं. आपल्या घराचं अंतरंग सजवण्यासाठी सर्व प्रथम आपल्या अंतर्मनातील सौदर्याचा अभ्यासपूर्वक विचार केलेला असणं जरुरीचं असतं. गृहसजावटीच्या कामात निवडल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूंचा उपयुक्तता आणि सौंदर्य या दोन्हीही दृष्टिकोनातून विचार केला जाण्याची आवश्यकता असते.

लेखसंग्रह

जसा संग तसा रंग

Category:

 

स्वाती नक्षत्राच्या पावसाचे थेंब शिंपल्यामध्ये पडल्यास ते मोती बनतात, जर ते थेंब पानावर पडले तर दव आणि सापाच्या तोंडात पडले तर त्याचे विष बनते. थेंब पावसाचे आहेत, परंतु जशी सोबत मिळाली तसे रूप बनले. जर एखाद्या पारस दगडाने लोखंडाला स्पर्श केला किंवा त्यात मिसळले तर ते सोने होते आणि जर लोखंडाला पाणी लागले तर जंक पकडतो. आपल सुद्धा तसेच नाही का? जशी संगत धरू तसे जीवन बनवू. पण मनुष्य जीवन मौल्यवान आहे. त्याचे मूल्य आपण जाणून घ्यावे.

कथा

नक्षलींच्या दहशती मुळे झालेले निर्वासित (कथा ६)

Category:

 

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक खेड्यातून ६० एक कुटुंबाना नक्षलवादींनी घराबाहेर काढून देशोधडीला लावलेले आहे. त्यांचे परतीचे मार्ग कायमचे बंद करून टाकलेले आहेत. सधन कुटुंबातील मंडळी साधे रोजी पगार मिळणारे कामगार म्हणून जीवन कंठीत आहेत.

कथा

एक परीस स्पर्श ( भाग – १८ )

Category:

 

मेनका त्याच्या आयुष्यात आलेली एकमेक मुलगी होती. जी त्याची सच्ची मैत्रीण आणि प्रेयसी होती. विजयला माहित होते की तिचे त्याच्यावर प्रेम आहे पण तिला माहित नव्हते की विजयचेही तिच्यावर प्रेम होते. मेनका जर स्वतःच्या तोंडाने म्हणाली असती की तिचे त्याच्यावर प्रेम आहे! तर विजयने नक्कीच तिच्याशी विवाह केला असता. पण ती व्यक्त झाली नाही आणि विजयला व्यक्त व्हायचं नव्हतं. प्रेमात मुली सहसा पहिल्यांदा व्यक्त होत नाहीत हे विजयला उशीर कळले म्हणून अनामिका समोर त्याने त्याचे हृदय मोकळे करण्याचा प्रयत्न केला पण ते जमले नाही की ते तिला कळले नाही.

लेखसंग्रह

मनाचं घराशी नातं

Category:

 

आपल्या घराचं अंतरंग सजवण्यात आणि खुलवण्यात आपल्या मानसिकतेचा संबंध असल्यामुळे अंतर्मनाचा त्यांत मोठा वाटा असतो. आपल्या अंतर्मनाच्या सहभागाशिवाय केलेलं अंतर्गत सजावटीचं काम आपल्याच घरात आपल्याला परकेपणा निर्माण करायला कारणीभूत ठरू शकतं. अर्थात, अशी एखादीच सजावट अपवादात्मक असू शकते, की जी आपल्या अंतरंगात न डोकावता केली गेली आहे.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ बल्लवाचार्य विष्णू मनोहर

Category:

 

मार्च २०२१ मध्ये शेफ विष्णू मनोहर यांनी पुण्यात ७ तासात ७ हजार किलो मिसळ शिजवण्याचा आणि ३ तासात ३००० सामाजिक संस्थांमार्फत ३० हजार गोरगरिब, गरजू लोकांपर्यंत ही मिसळ पोहोचवण्याचा विश्वविक्रम केला गेला आहे.

व्यक्ती-परिचय

अभिनेत्री मुग्धा चिटणीस

Category:

 

मुग्धा या केवळ अभिनेत्री नव्हत्या तर त्या उत्कृष्ट कथा-कथनकारही होत्या. भारत आणि अमेरिकेत त्यांनी कथाकथन शैलीत ५०० कार्यक्रम सादर केले होते. मुंबईतील ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये पुष्कळ कार्यक्रम सादर केले.

कथा

एक अभागी – नक्षलवादी दहशतीची बळी (कथा ५)

Category:

 

शाळेत मुळाक्षर,शिकणे, १०० पर्यंत आकडे मोजणे, प्रादेशिक कोया भाषेत हे सर्व लिहिता येणे, ही नक्षलवादी जनता सरकारची सर्व मुलामुलींना शिक्षण देण्याची पद्धत, इयत्ता वगैरेची गरज नाही, अबुजमाड भागात अशा शाळा आहेत. एवढे जुजबी शिक्षण घेतले की यातील काही मुले खेड्यातील आपली राहती चंद्रमोळी झोपडी सोडून जंगलातील नक्षलवादिंच्या तंबूत राहण्यास येतात व तेच त्यांचे कायमचे आयुष्य जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत, नाहीतर केंव्हाही मृत्यूच्या जाळ्यात अडकायचे, नक्षल प्रमुखाच्या गोळीने नाहीतर पोलिसांच्या गोळीबारात.

कथा

एक परीस स्पर्श ( भाग – १७ )

Category:

 

काल  कित्येक वर्षानंतर विजयने पुन्हा हातात रंग आणि ब्रश घेतला. त्याच्या पुतणीला  एक चित्र काढून हवं होतं. पण विजयचा हात आता पूर्वीसारखा वळण घेत नव्हता. पूर्वी तो चित्र काढताना त्याला खोडरबर क्वचितच वापरावा लागत असे.

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गोंड आदिवासी समाजातील परंपरेचे बळी – कुरमाघर (कथा ४)

Category:

 

वास्तविक निसर्गपूजक माडियागोंड जातीच्या आदिवासीत मातृसत्ताक पद्धत असून  घर चालविण्यात स्त्रीचा मोठा वाट आहे .ती दिवसभर घर व शेतीकामात गढलेली असते,अशा स्त्रीला मासिक पाळीच्या वेळी मात्र कुरमाघरात राहते घर सोडून राहण्यास जावेच लागते.