No Picture
दिनविशेष

जागतीक रेडिओलॉजी दिवस

Category:

 

एक्स-रे रेडिओग्राफी, फ्लुरोस्कोपी, कंप्युटरराईज्ड टोमोग्राफी (उढ), मॅग्नेटिक रिजनेंस इमेजिंग (एमआरआय), न्युक्लिअर मेडिसिन, पोसीट्रॉन एमिशन टोमोग्राफी (झएढ), फ्यूजन इमेजिंग, अल्ट्रासाऊंड अशा अनेक स्त्रोतांच्या माध्यमातून रेडिओलॉजी केली जाते

No Picture
दिनविशेष

नोटबंदीची पाच वर्ष

Category:

 

२०१५-१६ ला जे काही कागदी चलन भारतात होते, त्यातील ९५ टक्के चलन हे उच्च मूल्याच्या नोटांच्या रुपात होते. (१००० च्या नोटा- ३८ टक्के, ५०० च्या नोटा- ४५ टक्के आणि १०० च्या नोटा- १० टक्के) याचा अर्थ ३० टक्के नागरिक दारिद्य्ररेषेखाली जीवन जगत असताना एकूण चलनाचे ९५ टक्के मूल्य अशा तीन मोठ्या नोटांत होते. त्यामुळे पैसा फिरत नव्हता आणि त्याचे एक दुष्टचक्र तयार झाले होते.

No Picture
कथा

नक्षत्रांची वेल

Category:

 

नेहमीच्या सवयीनं डोअरबेल वाजवण्यासाठी , नंदिनीनं हात वर केला , पण बेल न वाजवता ती तशीच उभी राहिली . बेल वाजवावी की पुन्हा लिफ्टनं खाली जावं ? तिनं गोंधळलेल्या मनालाच प्रश्न विचारला .

आणि तसंही आता खाली जाऊन काय उपयोग ? तो रिक्षावाला एव्हाना गेटमधून दूर गेलासुद्धा असेल. आपण उगीच बोललो त्याला. तो काय म्हणत होता हे ऐकून घ्यायची आपल्या मनाची तयारीसुद्धा नव्हती. अक्षरशः हाकलून दिल्यासारखं केलं आपण . असला कसला आपला संताप ? समोरच्याचं ऐकून न घेण्याइतका संताप ? छे ! चुकलंच आपलं . नंदिनी अस्वस्थ झाली .

No Picture
व्यक्ती-परिचय

माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार

Category:

 

अरविंद इनामदार यांना खोटे, आणि चुकीचे घडलेले कधीही खपत नसे. म्हणूनच त्यांनी आपली कारकिर्द पणाला लावून कायम पोलीस दलातील वाईट गोष्टींवर सतत बोट ठेवले. या सद्गुणांचा मोठा फटका आपल्याला बसल्याचेही ते वारंवार मुलाखतींमधून सांगत असत.

No Picture
साहित्य - ललित

स्वीचबोर्ड

Category:

 

जेव्हा मी माझ्या पहिल्या जहाजावर ज्युनिअर इंजिनिअर म्हणून जॉईन झालो तेव्हा तिथल्या इंजिन कंट्रोल रूम मध्ये असलेला स्वीचबोर्ड पहिल्यांदा बघितल्याक्षणी शॉक्ड झालो, मनात आले, आयला हे कुठं येऊन फसलो आपण.

No Picture
व्यक्ती-परिचय

ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले

Category:

 

धूमकेतू म्हटलं की, आपल्याला लगेच आठवतो तो ‘हॅले’ चा धूमकेतू. या धूमकेतूचं नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या नावावरून दिलं गेलं. १६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला.

No Picture
व्यक्ती-परिचय

कर्करोग संशोधक डॉ.कमल जयसिंग रणदिवे

Category:

 

रणदिवेंना वासंती देवी अमीरचंद पुरस्कार, वाटुमल फाउण्डेशनचा पुरस्कार, सॅडो अवॉर्ड, टाटा मेमोरियल सेंटरचे सुवर्णमहोत्सवी मानचिन्ह व बनारस हिंदू विद्यापीठाचा पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले. त्यांची इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी व महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेत ‘फेलो’ म्हणून निवड झाली. महाराष्ट्र राज्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान समितीच्या सदस्या असताना त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ ही पदवी बहाल करून राष्ट्रपातळीवर त्यांच्या कार्याचा गौरव केला.

No Picture
लेखसंग्रह

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग २ – पिंपळ

Category:

 

पिंपळाला भारतीय समाजात मानाचे व पूजनीय स्थान आहे. हिंदू संस्कृतीत, ज्या वृक्षांना ‘तोडू नये’ असा दंडक आहे, त्यापैकी हा एक. अश्वत्थ मारुतीचे (पिंपळाखाली असलेल्या मारुतीचे) मारुतीचे पूजन हितकारी, पुण्यकारक म्हणून वर्णिले आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ हा पुष्य नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.