साहित्य - ललित

भक्ती बर्वे-इनामदार आणि जया भादुरी-बच्चन

Category:

 

भक्ती बर्वे -इनामदार आणि जया भादुरी -बच्चन यांच्यात एरवी वरवरचे एकच साम्य वाटेल -दोघीही माहेर -सासरचे आडनांव लावतात. फारतर दोघीही उच्च प्रतीच्या अभिनेत्री ! पण त्या दोघींमधील गुह्य एका हृद्य प्रसंगाने अनुभवले.

लेखसंग्रह

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५०

Category:

 

अशा स्वरूपात भगवान श्रीविष्णूच्या अलौकिक स्वरूपाच्या सगुण-साकार रूपाचे वर्णन केल्यानंतर आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात त्यांच्या निर्गुण-निराकार स्वरूपास वंदन करीत आहेत. सगुण साकार रूप भक्तांच्या सुविधेसाठी भगवंताने धारण केली असले तरी त्यांचे मूळ स्वरूप निर्गुण निराकार आहे हेच आचार्य येथे अधोरेखित करीत आहेत.

साहित्य - ललित

प्रेमात? वाट्टेल ते! (लघुकथा)

Category:

 

वाट पहाणं किती त्रासदायक असत, हे समीरला आज पुन्हा जाणवलं. ‘साल, या पोरींना वेळच महत्वच नसत!’ त्याने सातव्या वेळेला आपल्या मनगटावरील घड्याळातवर नजर टाकली. आख्खे वीस मिनिट, तो या प्रेमदान हॉटेलच्या लॉन वर अंजलीची वाट पाहत होता! धिस इज टू मच! वेटर दोनदा ऑर्डरसाठी घुटमळून गेला होता.

साहित्य - ललित

एकांकिकेला कथेचे “कलम”

Category:

 

मागील आठवड्यात माझ्या शालेय मैत्रिणीच्या मुलीने फोन केला- पुढील महिन्यात तळेगांवला होणाऱ्या एका एकांकिका -वाचन स्पर्धेसाठी तिला (माझ्याकडे एखादी रेडिमेड असली तर ती किंवा नवी लिहिणं शक्य असेल तर नवी) माझी एक एकांकिका १५ ऑगस्टच्या आत हवी होती. पात्रं तीन हवीत आणि वाचन -कालावधी किमान एक तास ! ती “पुरुषोत्तम” आणि “फिरोदिया” वाली नवी पिढीची आणि मी एकांकिका -लेखन थांबवून २५ हून अधिक वर्षे झालेली.

लेखसंग्रह

ठेच-लागलीच पाहिजे

Category:

 

मित्रांनो ! आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या !! कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी, सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाचवेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं!

साहित्य - ललित

अन्नासाठी दाही दिशा

Category:

 

कोपऱ्यात गुळाचा खडा ठेवा, थोड्याच वेळांत अनेक मुंगळे वेगवेगळ्या दिशेने त्या गुळाच्या खड्याभोवती जमतात. मधाचा एक थेंब वेगळाच गंध पसरवितो. ज्यामुळे अनेक माश्या उडत त्याच्या जवळ जमा होतात. कोठेतरी पडलेल्या मृत प्राण्या भवती असंख्य किडे आळ्या अशाच पद्धतीने जमा होतात. ते त्यांचे भक्ष असते.