साहित्य - ललित

“छत्री धर”

Category:

 

पूर्वी पावसाळा सुरु झाला की, माळ्यावर ठेवलेल्या छत्र्यांचा शोध घेतला जायचा. त्या नादुरुस्त असतील तर त्यांची दुरुस्ती केली जायची. प्रत्येक पेठेतील एखाद्या चौकात छत्री दुरुस्ती करणारा दिसायचाच. काही फिरते छत्री दुरुस्ती करणारे गल्लीतून ‘ए छत्रीऽऽवाला’ असं ओरडत जाताना दिसायचे. जुन्या काळ्या छत्र्या, मोठ्या आणि दणकट असायच्या. तिची मूठ लाकडी असायची. कापडही चांगल्या दर्जाचं असायचं. दहा वीस वर्षांचे पावसाळे त्या आरामात सहन करायच्या.

लेखसंग्रह

स्वतःला घडविताना !

Category:

 

प्रत्येकाला स्वतःमधील कोणीतरी असा “स्वतः “घडविता आला पाहिजे, ज्याचा इतरांना अभिमान वाटेल, स्वतःची मान गर्वाने उन्नत करता येईल आणि जे डोळ्यापुढे असेल, ते हाताच्या आवाक्यात आणता येईल. त्या वाटेवरील काही पायऱ्या….

साहित्य - ललित

कुलूप

Category:

 

पन्नास वर्षांपूर्वीचा पहिलीचा वर्ग. मुलांचा वर्गात चिवचिवाट चाललेला. बाई वर्गात येतात आणि मोठ्या आवाजात मुलांना सांगतात, ‘हाताची घडी, तोंडाला कुलूप!’ एका क्षणात मुलं हाताची घडी घालतात व गप्प बसतात. तेव्हा त्या लहान मुलांच्या मनात पहिला धडा गिरवला जातो की, ‘कुलूप’ याचा अर्थ ‘बंद’!

अवर्गिकृत

ग्राऊंडिंग

Category:

 

झोपेत असताना जहाज एकदम कशाला तरी धडकल्याचे जाणवले आणि हळू हळू धक्के लागत असल्याचा भास झाला आणि तेवढयात अचानक इमर्जन्सी अलार्म वाजायला लागला. सगळ्यांच्या केबिन चे दरवाजे एका मागोमाग उघडायला लागले आणि जो तो मस्टर स्टेशन कडे पळायला लागला होता.

साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३६)

Category:

 

साहित्यिक , विचारवंतांच्या सहवासातूनच योगायोगाने आमच्या महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेची शाखा मुंबई प्रदेश व ठाणे जिल्हा (महाराष्ट्र्) येथे माझे मित्र कविवर्य प्रा. जयंतराव भावे यांच्या अथक प्रयत्नातून सुरू झाली. साहित्य हे वैश्विक आहे. साऱ्या जगभरात मराठी भाषिक आहेत. सध्याच्या या फेसबुक / वाट्सअपच्या जमान्यात या वरील मित्रांचा सहज संपर्क संवाद होत आहे. अनेक मराठी लेखक/कवी आपल्याशी जोडले गेले आहेत.

दिनविशेष

प्रभात’ चा ‘रामशास्त्री प्रभुणे’ प्रदर्शित – ३० जून १९४४

Category:

 

आज दिनांक ३० जून. ‘प्रभात फिल्म कंपनी’ च्या ‘रामशास्त्री प्रभुणे’ या चित्रपटास प्रदर्शित होऊन ७७ वर्षं पूर्ण होऊन ७८ वे वर्ष लागलं. 

साहित्य - ललित

जाहल्या काही चुका…..

Category:

 

एक अत्यंत नितांत सुंदर भावना शब्दबद्ध करणं हे खूपच अवघड काम पण पाडगावकरांनी ते लीलया पार पाडले. खळेंसारख्या श्रेष्ठ संगीतकाराने आपल्या चालीने आणि संगीताने त्यात आणखी गहिरे रंग भरले. आणि लताने ती आर्तता, लीनता, अत्यंत संयमित, संतुलित आणि शांत स्निग्ध स्वरात परीपक्वपणे मांडली. या गाण्यातील शब्दाशब्दांचे विवेचन आमच्या मैत्रिणीने तितक्याच तोलामोलाने सिद्ध केले -अभिनिवेश न आणता !