साहित्य - ललित
वहिची पाने
Category:
साहित्य - ललितएक नामजप लिहायचे ठरवले होते. म्हणजे काय झालं मन अस्वस्थ झाले होते. म्हणून एका हितचिंतकांनी सांगितले होते की अमूक एका संख्येत लिहा. मनात आलं की ते करणे हा स्वभाव. त्यामुळे वही आणून घेतली. पहिल्या पानावर अगोदर श्री राम प्रसन्न असे लिहिले. ती लहानपणीची शिकवण. नंतर नांव. दिनांक. आणि त्याच पानावर पाच देवांची नांवे लिहिली.