व्यक्ती-परिचय

अभिनेत्री किशोरी गोडबोले

Category:

 

किशोरी गोडबोले आता मेरे साई या मालिकेत बायजा माँ च्या भूमिकेत दिसत आहेत. मेरे साई या मालिकेद्वारे किशोरी तीन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतल्या आहेत.

व्यक्ती-परिचय

अभिनेते शरद तळवलकर

Category:

 

शरद तळवलकर यांना स्टेजवर अभिनय करताना पाहणे म्हणजे पर्वणीच असे . त्यांच्या ‘ अप्पाजींची सेक्रेटरी ‘ या नाटकात तर त्यांनी इतकी धमाल केली होती की त्यांनी जे नाटक पाहिले आहे तो ते नाटक कधीच विसरू शकणार नाही. जवळजवळ ६० वर्षे ते अभिनय करत होते.

व्यक्ती-परिचय

अभिनेते व नाटककार विष्णु हरी औंधकर

Category:

 

बालवयातच त्यांनी महाराष्ट्र नाटक मंडळीत स्त्रीपार्ट करण्यासाठी प्रवेश केला. तेथे त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘शिवसंभव’, ‘कांचनगडची मोहना’ इत्यादी नाटकांतून कामे केली. त्याच वेळेस दादासाहेब फाळके ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाची निर्मिती करत होते. या चित्रपटात भूमिका करण्यासाठी ते नट मंडळी शोधत होते. त्यांच्या नजरेत औंधकर आले व त्यांनी औंधकर यांना आपल्या चित्रपटात भूमिका दिली.

व्यक्ती-परिचय

अभिनेते सतीश दुभाषी

Category:

 

अंमलदार, शांतता कोर्ट चालू आहे, नटसम्राट, आणि सूर राहू दे आणि सर्वात गाजलेले म्हणचे पु लं देशपांडे यांचे ती फुलराणी या नाटकांमधील त्यांचे काम अजरामर आहे.

व्यक्ती-परिचय

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे

Category:

 

त्यांची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्यासमवेत. कोठारेंचा चित्रपट अन लक्ष्या नाही असे सहसा घडलेच नाही.कारण महेश कोठारे व लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री अशी ओळख निर्माण झाली होती.

व्यक्ती-परिचय

अभिनेते मनोज जोशी

Category:

 

मनोज जोशी यांनी सर्फरोश या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. सरफरोश, चांदनी बार, हंगामा, देवदास, हलचल, पेज 3, फिर हेरा फेरी से, चुप चुप के, गरम मसाला, गोलमाल, भागम भाग, भूलभुलैया, मेरे बाप पहले आप, बिल्लू, दे दना दन खट्टा-मीठा हे त्यांचे काही हिंदी चित्रपट होत.

व्यक्ती-परिचय

अंपायर डेव्हिड शेफर्ड

Category:

 

भरदार शरीरयष्टीच्या शेफर्ड यांनी १९८३ ते २००५ या एका तपाच्या कारकिर्दीत ९२ कसोट्या अन १७२ एकदिवसीय सामन्यात पंच म्हणून काम पहिले. याशिवाय तब्बल १४ वर्षे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ग्लूस्टरशायरचे प्रतिनिधित्वही केले.

व्यक्ती-परिचय

अभिनेते उदय टिकेकर

Category:

 

उदय टिकेकर यांनी ‘शमिताभ’, ‘बर्फी’, ‘रईस’, ‘लाल सलाम’ या हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलं आहे. ‘तुझा माझा ब्रेक अप’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘कोई अपना सा’, ‘कसौटी जिंदगी की’ या मराठी-हिंदी मालिकेत उदय टिकेकर यांनी काम केले आहे.

व्यक्ती-परिचय

‘बॉण्ड गर्ल’ अभिनेत्री डीन ऑगर

Category:

 

पॅरिस येथे जन्म झालेल्या डीन ऑगर यांनी १९६० साली मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर जीन कॉकट्यु दिग्दर्शित ‘टेस्टमेंट ऑफ ऑरफ्युअस’ या फ्रेंच चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

व्यक्ती-परिचय

‘चित्रपटसृष्टीचा विश्वकोश’ श्रीराम ताम्रकर

Category:

 

श्रीराम ताम्रकर हे त्यांच्या चाहत्यांमध्ये ‘चित्रपटसृष्टीचा विश्वकोश’ म्हणून लोकप्रिय होते. मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाने २०१० मध्ये दादासाहेब फाळके अकादमीचा ‘ज्येष्ठ चित्रपट पत्रकार पुरस्कार’ आणि ‘बेस्ट फिल्म क्रिटिक’ पुरस्कार यांच्यासह त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.