व्यक्ती-परिचय

दिग्दर्शक एन एस वैद्य

Category:

 

त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांचे संकलन केले होते व एक उत्कृष्ट संकलक म्हणून नावलौकिक मिळविला होता. ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक दादा कोंडके, कमलाकर तोरणे, अण्णासाहेब देऊळगावकर, जब्बार पडेल, महेश कोठारे आदींच्या चित्रपटांचे संकलन वैद्य यांनी केले होते.

  November 10, 2021


व्यक्ती-परिचय

खासदार विनय सहस्रबुध्दे

Category:

 

शिक्षण संपवून तब्बल पाच वर्षे अ.भा.वि.प. चे पूर्ण वेळ कार्यकर्ते बनले. त्या काळातले त्यांचे गुरू व मार्गदर्शक प्रा.यशवंतराव केळकर, ह्यांना ते कधी विसरू शकणार नाहीत. ‘कार्यकर्ता म्हणून मी जो काही आहे त्याचे सगळे श्रेय केळकर ह्यांना आहे’ असे ते म्हणतात.

  November 10, 2021


साहित्य - ललित

हरवलेला मधुचंद्र

Category:

 

मी तीस वर्षांनंतर पुन्हा महाबळेश्वरला चाललो होतो. मी गाडी चालवत होतो व माझ्या शेजारी प्रतिमा बसलेली होती. कात्रजचा घाट सुरु झाला होता.. घाटातील प्रत्येक वळणावर, मला तीस वर्षांपूर्वीचा आमचा मोटरसायकलवरचा पहिला प्रवास आठवू लागला..
मी खेड्यातून शहरात येऊन शिक्षण घेतले. पुणे विद्यार्थी गृहात आश्रमवासी म्हणून राहून ते पूर्ण केले. तेथीलच प्रिंटींग टेक्नाॅलाॅजीचा अभ्यासक्रम पूर्ण करुन डिप्लोमा घेतला. माझ्या सरांच्या ओळखीने मला एका प्रेसमध्ये नोकरी मिळाली. दोन वर्षांतच माझं प्रिंटींगमधलं कौशल्य पाहून प्रेसच्या मालकांनी मला स्वतंत्र प्रेस थाटून दिला. माझ्याकडे दोन ट्रेडल मशीन होती. मी रात्रंदिवस काम करुन या व्यवसायात यश प्राप्त केले..

  November 10, 2021


साहित्य - ललित

निद्रा नाश करुनि होते ते काय (सुमंत उवाच – ६९)

Category:

 

झोपच येत नाहीये, झोपच येत नाही अजिबात रात्री. काय करावं कळत नाही, अख्खी रात्र विचारांमध्ये जाते. सुचतंच नाही काही, नुसता डोक्याचा भुगा झालाय. काहीतरी गडबड आहे डोक्यात त्याशिवाय हे असं होणार नाही.

  November 10, 2021


लेखसंग्रह

धावणारा काळ

Category:

 

आपली घड्याळं ही दिवसाच्या या चोवीस तासांच्या कालावधीवर आधारलेली आहेत. पृथ्वीच्या प्रदक्षिणा काळातील बदलामुळे आपली घड्याळं ही अधूनमधून पृथ्वीप्रदक्षिणेशी जुळवून घ्यावी लागतात. पृथ्वीचा वेग बहुधा कमी होत असल्यानं, दिवसाचा कालावधी वाढत असतो. दिवस चोवीस तासांचाच असण्यासाठी आपल्याला आपली घड्याळं मागे न्यावी लागतात. यासाठी घड्याळ किंचितसं थांबल्याचं मानलं जात.

  November 9, 2021


व्यक्ती-परिचय

सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे

Category:

 

स्विट्झर्लंडमधील माउंट टिटिलिस या युरोपातील सर्वोच्च शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान देण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नांवावर जमा आहे.

  November 9, 2021


दिनविशेष

राजकमल कलामंदिरचा वर्धापन दिन

Category:

 

राजकमल बद्दल त्या काळी असे म्हणले जायचे की निर्मात्याने स्क्रिप्ट घेऊन यावे व चित्रपटाची रिळे घेऊन जावी. व्ही.शांताराम यांनी राजकमल मध्ये एडिटींग, रेकॉर्डिग, डबिंग, मिक्सिंगचे स्टूडियो बनवले होते. या स्टुडिओमध्ये ब्लॅक आणि व्हाइट चित्रपटाची प्रोसेसिंग लॅबही होती.

  November 9, 2021