साहित्य - ललित

झोंबतो ‘गारवा’

Category:

 

सदाशिव पेठेत एकेकाळी नॉनव्हेज निषिद्ध होतं. हळूहळू शेडगे आळीतील ‘हॉटेल नागपूर’ने सुरुवात झाली. मंडई जवळील बाबू गेनू चौकातील ‘दुर्गा’ची बिर्याणी सुप्रसिद्ध होती. कुमठेकर रस्त्यावर कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या मागे आवारे मटनाची खानावळ होती, ती आता नव्या दिमाखात उभी आहे.

साहित्य - ललित

टॅटू

Category:

 

अरे हे काय गोंदवून घेतलंस दंडावर?? एका मित्राला त्याच्या दंडावर केलेली रंगीबेरंगी कलाकारी अभिमानाने दाखवत असताना बघितल्यावर विचारले. रंगीबेरंगी नव्हतं फक्त लाल आणि काळपट हिरव्या रंगात कसली तरी सिँहाच्या तोंडासारखी आकृती होती.

साहित्य - ललित

डबल सीट

Category:

 

“डबल सीट’ म्हणजे एकाच दुचाकीवरील दोघांचा प्रवास.. माझ्या लहानपणी मी वडिलांच्या सायकलच्या दांडीवर असलेल्या छोट्या लाकडी सीटवर बसून फिरायला जात असे.

साहित्य - ललित

डाकिया डाक लाया

Category:

 

राजशेखर मॅट्रिक झाल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला पोस्ट खात्यात लावून घेतले.. आणि त्याची पोस्टमनची नोकरी सुरु झाली. आमच्या भेटीसाठी कमी झाल्या. काही वर्षांनंतर तो घरी आला व लग्न ठरल्याचे त्याने आम्हाला सांगितले. भावी पत्नीचा फोटोदेखील त्याने पाकीटातून काढून आम्हाला दाखवला.

साहित्य - ललित

गुरखा

Category:

 

माझ्या लहानपणी मी सदाशिव पेठेत रात्री हातात मोठी बॅटरी घेऊन फिरणारा गुरखा पाहिलेला आहे. त्याचा तो खाकी गणवेश, डोक्यावरील काळी तिरपी टोपी, त्या टोपीवर असलेले दोन खुकरीचे मेटलचे लावलेले चिन्ह अजूनही आठवतंय. त्यांचे चायनीज सारखे दिसणारे बारीक डोळे आणि गालावरील उभ्या असंख्य सुरकुत्या हीच त्यांची ओळख असायची. त्याच्या उजव्या हातात एक दंडुका असायचा.

साहित्य - ललित

गोडांबा @ मांडवा, अलिबाग

Category:

 

गोडांब्या कडे बघूनच कोणालाही डेरेदार वृक्ष प्रत्यक्षात कसे असतात हे लगेच लक्षात येईल. भरगच्च पानांनी नेहमी बहरलेल्या गोडांब्याच्या खाली मे महिन्याच्या गर्मीत सुद्धा थंडगार वाटते. त्याच्या शितल छायेत एकदा बसल्यावर पुन्हा संध्याकाळ होईपर्यंत उठायची इच्छाच होत नाही.

साहित्य - ललित

चेहरे पावसाचे

Category:

 

तो मी नव्हेच’ नाटकामध्ये, ‘लखोबा लोखंडे’ची आपण अनेक रूपं पाहिली. त्यामध्ये व्यक्ती एकच होती, त्यानं बदलली होती ती, स्वतःची रूपं… तसंच आपल्याला आत्ताच्या पावसाबद्दल सांगता येईल.. पाऊस तोच, मात्र त्याचं पडण्याचं ठिकाण बदललं की, त्याची रूपंही बदलत जातात..

साहित्य - ललित

जकार्ता मेडिकल चेक अप

Category:

 

सकाळी सव्वा सात वाजता एजंट सैफुल हॉटेलच्या लॉबी मध्ये येऊन थांबला होता. अर्ध्या तासात हॉस्पिटल असलेल्या भागात पोचलो, पण माझे मेडिकल चेक अप नेहमीच्या हॉस्पिटल मध्ये नसल्याने सैफुल ला थोडं शोधावं लागलं. जकार्ता मधील लिप्पो व्हिलेज या पॉश एरिया मध्ये सिलोम हॉस्पिटल ची मोठी शाखा होती.

साहित्य - ललित

जानेमाने मॅनेजर

Category:

 

१९८१ पासून जाहिराती व डिझाईनचे काम करीत असताना प्रत्यक्ष ग्राहक व आम्ही काम करुन देणारे, यांच्यामध्ये ‘मॅनेजर’ उर्फ मध्यस्थी म्हणून काम करणारी एखादी व्यक्ती असायचीच. काम करवून घेणे, त्या कामासाठी वारंवार आठवण करणे अशी त्या व्यक्तीची जबाबदारी असायची.

साहित्य - ललित

गुलकंदी’ शरद गटणे

Category:

 

व्यक्ती आणि वल्ली’ मधील ‘पुलं’चा सखाराम गटणे सर्व रसिक वाचकांना परिचित आहे. तो ‘पुलं’चा आज्ञाधारी शिष्य होता, मला भेटलेल्या शरद गटणेंचा मी आज्ञाधारी ‘शिष्य’ आहे!