सोलापूर – इतिहास
Category:
शहरे आणि गावेइ.स.पूर्व दुसर्या शतकापासून सोलापूर जिल्ह्याने अनेक राजवटींचा उदय आणि र्हास पाहिला आहे. इ.स. पूर्व २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्यावर राज्य करुन गेल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मोगल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते.
June 26, 2015