कोथिंबिरीचे समोसे
Category:
खाद्ययात्रामैद्यामध्ये गरम तेलाचे मोहन आणि मीठ घालून मैदा भिजवून ठेवावा. कोथिंबीर निवडून, धुऊन, चिरून घ्यावी. कढईत अर्धा डाव तेल गरमकरून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात चिरलेली कोथिंबीर घालून दोन वाफा आणाव्या. त्यात लाल तिखट, चारोळी, मीठ, गरम मसाला, डाळीचे पीठ, मीठ घालून भाजीप्रमाणे परतावे. गॅस बंद करून लिंबाचा रस घालून सारण सारखे करून गार करावे.
December 16, 2015