अवर्गिकृत

संत ज्ञानेश्वर (१९४०)

Category:

 

संत ज्ञानेश्वर हा चित्रपट १९४० रोजी प्रदर्शित झाला. अमेरिकेतील चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. १९७२ रोजी मुंबई दूरदर्शनच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला दूरचित्रवाणीवरील हा पहिला मराठी चित्रपट होय..

लेखसंग्रह

नाट्य-चित्र कानोसा – आजचा दिवस माझा

Category:

 

आजचा दिवस माझा – राजकीय “माणूस टिपणारा” चित्रपट. राजकीय पदाच्या अतिउच्च स्थानावर पोहोचण्याआधी व नंतर आपली माणूस म्हणून असलेली छबी कशी जपावी हे “आजचा दिवस माझा” मधून अधोरेखीत करण्याचा प्रयत्न लेखक आणि दिग्दर्शकाने केला आहे.

अवर्गिकृत

अयोध्येचा राजा ( १९३२ )

Category:

 

गोविंदराव टेंबे, मास्टर विनायक, दुर्गा खोटे, बाबुराव पेंढारकर अशा कलाकार मंडळींच्या सहज-सुंदर अभिनयाने तयार झालेली ही कलाकृती म्हणजे मराठी चित्रपट विश्वातलं “मानाचं सुवर्ण पान” म्हणावं लागेल. ६ फेब्रुवारी १९३२ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला.

अवर्गिकृत

संत तुकाराम – १९३६

Category:

 

१९३७ साली व्हेनिस इथे आयोजित करण्यात आलेल्या ”व्हेनिस फिल्म फेस्टीवल” ला भारताकडून या चित्रपटाची निवड झाली आणि जगातील तीन सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून ”संत तुकाराम” या सिनेमाचा गौरव झाला.

अवर्गिकृत

माणूस (१९३९)

Category:

 

१९३९ मध्ये प्रभात फिल्म कंपनीने बनवलेला हा चित्रपट. व्ही शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने रसिकांच्या मनावर राज्य केले.

शेजारी – (१९४१)
अवर्गिकृत

शेजारी – (१९४१)

Category:

 

व्ही. शांताराम यांच्या सर्जनशील शैलीतून साकारलेला, सामाजिक एकात्मतेचा आणि धार्मिक सलोखा राखण्यासाठी दोन जीवाभावांच्या हिंदू-मुस्लिम शेजार्‍यांची कथा, “शेजारी” या चित्रपटातुन दाखवण्यात आली आहे.

अवर्गिकृत

अमर भुपाळी (१९५१)

Category:

 

राजकमल कलामंदिर निर्मित हा चित्रपट १९५१ मध्ये पडद्यावर आला. विश्राम बेडेकर यांची कथा, वसंत देसाईंचं सुमधुर संगीत, आणि लता मंगेशकरांच्या आवाजातील अप्रतिम गाणी ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये. या चित्रपटातील होनाजीची प्रमुख भूमिका साकारली पंडितराव नगरकर यांनी. याचबरोबर संध्या, ललिता पवार, भालचंद्र पेढारकर यांच्या भूमिका आणि व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट सदाबहार चित्रपटांपैकी एक अशी ओळख निर्माण करुन गेला.

अवर्गिकृत

मराठी विज्ञान परिषद, मुंबई

Category:

 

मुंबईतील मराठी विज्ञान परिषद ही संस्था मराठीतून विज्ञान प्रसारासाठी कार्य करते. मराठी समाजामध्ये विज्ञानाबद्दल जागरुकता आणि जाणीव निर्माण करण्यासाठी परिषदेची कामे चालतात.

संस्थेचे विविध उपक्रम, प्रकाशने, पुस्तिका तसेच यांची माहिती www.mavipamumbai.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे. साईटवर माहिती बरीच आहे. मात्र बयाचशा links इंग्रजी साईटसना दिलेल्या दिसतात. त्याऐवजी हीच माहिती मराठीत दिली असती तर कदाचित परिषदेच्या उद्दीष्टांची जास्त चांगल्या प्रकारे पूर्ती झाली असती.