दादाजी खोब्रागडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteघरी अठराविश्वे दारिद्य असलेल्या दादाजी खोब्रागडे या कृषी संशोधकाने अवघ्या दीड एकर शेतीत तांदळाची तब्बल नऊ वाणे विकसित केली आहेत. त्यांच्या या संशोधनाकडे राज्य सरकारने पाठ फिरवली असली तरी जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने या कृषी संशोधकाची दखल घेतली आहे. फोर्ब्सने जगभरातील ग्रामीण उद्योजकांची एक यादी प्रसिद्ध केली आहे, त्यात चंदपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या आडवळणाच्या गावात राहणार्या दादाजी खोब्रागडे यांचादेखील समावेश करण्यात आला आहे.