लेखसंग्रह

उपद्रवी ते निरूपद्रवी

Category:

 

वर्गसंघर्ष हा प्रकार कोणत्याही समाजाला नवीन नाही. मग तो समाज युरोप-अमेरिकेतील एखाद्या अतिविकसित राष्ट्रातला असो, अथवा आप्रि*केतील एखाद्या मागासलेल्या राष्ट्रातला असो; वर्गसंघर्ष प्रत्येक ठिकाणी असतोच आणि साधारणत: त्याचे स्वरूप ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ असेच असते. प्रत्येक ठिकाणी या वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे समाजघटक, वर्ग, गट किंवा लोक वेगवेगळे असू शकतात, परंतु संघर्षाचे स्वरूप ढोबळमानाने हेच असते.

  June 29, 2008


लेखसंग्रह

शेतकर्‍यांनी नक्षलवादी व्हावे काय?

Category:

 

सरकारने आधी शेतकऱ्यांना रासायनिक शेतीचा पाठ पढवित त्यांच्या पायातील बळ हिरावून घेतले, त्यांना कुबड्या दिल्या आणि आता खते, बियाण्यांची टंचाई निर्माण करून या कुबड्याही हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. विवश शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय आहे? त्यांनाही तुम्ही गोळ्या घालणार?

  June 22, 2008


लेखसंग्रह

अधोगती सरकारमुळेच!

Category:

 

महागाईचे हे चक्र अशा विचित्र गतीने फिरत आहे की, महागाईचा फायदा कुणालाच होताना दिसत नाही. अन्नधान्याची महागाई वाढली तर किमान शेतकऱ्यांना तरी फायदा व्हायला हवा, परंतु तसेही दिसत नाही. चलनवाढ झाली असेल तर स्वाभाविकच कराच्या रूपाने सरकारी तिजोरीत अधिक पैसा जमा व्हायला हवा, तसा तो होत असेलही, परंतु त्या पैशाचा उपयोग विकासकामासाठी व्हायला हवा, तसे होताना दिसत नाही.

  June 15, 2008


लेखसंग्रह

मराठी अस्मितेचा हुंकार

Category:

 

शिवसेना ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा प्रवास करणारा नेता राज ठाकरे आज आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जी राजकारणात गरुडझेप घेत आहे, ती अनेक राजकीय दिग्गजांना विचारात ठाकणारी आहे. शिवसेना सोडल्यानंतर हा नेता नेमके काय करणार हा अनेकांना प्रश्‍न पडला होता.

  June 14, 2008


लेखसंग्रह

कुटुंब नियोजन,सरकारी स्टाईल!

Category:

 

शारीरिक स्वास्थ्याचा थेट संबंध आहार आणि आरोग्यविषयक सवयींशी आहे. आज आमच्या आहारात रासायनिक विषाचे प्रमाण
इतके वाढले आहे की आजच्या पिढीची एकूणच शारीरिक क्षमता अगदी खालावत गेली आहे. आजारांचे, विकारांचे प्रमाण
वाढले, रोगप्रतिकारक शत्त*ी कमी झाली आणि त्याचा थेट परिणाम पुरुषांच्या ‘पुरुषत्वावर’ आणि स्त्तियांच्या ‘मातृत्वावर’ झाला.

  June 8, 2008


लेखसंग्रह

तुला सलाम!

Category:

 

आम्ही ना धड शेतीला न्याय देऊ शकलो, ना धड उद्योगांना. कायमच्या दुर्लक्षामुळे शेती कोलमडून पडली आणि दिशाहिन नियोजनामुळे उद्योगांचे तीन-तेरा वाजले. त्याचा परिणाम आज दिसून येत आहे.

  June 1, 2008


लेखसंग्रह

इकडे आड तिकडे विहीर

Category:

 

जेव्हा देशाच्या विकासाचा प्रश्न येतो तेव्हा आर्थिक स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. देशाची अर्थव्यवस्था मजबूत असेल तरच तो देश अनेक संकटांवर मात करू शकतो आणि अनेक संकटांना दूर ठेवू शकतो.

आपल्या देशाचे वर्णन करताना अनेक चांगली विशेषणे कवींनी, साहित्यिकांनी वापरली आहेत.

  May 25, 2008


लेखसंग्रह

करावे तरी काय?

Category:

 

आपल्याकडे निष्क्रियता हा अपराध नाही, उलट त्याचे कौतुकच होते. एखाद्याने काही कल्पकता दाखवून वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तो अपराध ठरतो. सव्वाशे कोटींचा हा देश आहे.

  May 18, 2008


अवर्गिकृत

आधुनिक परंपरेतील दुवा निखळला

Category:

 

 लौकिकदृष्ट्या विजय तेंडुलकरांचे शिक्षण फारसे झाले नसले तरी आयुष्य जगण्याच्या महाविद्यालयात त्यांनी अनेक प्रकारचे अलुभव घेतले. हे शिक्षण घेत असताना त्यांना माणसातील माणूसपणांचे आणि त्यांच्यातील पशुत्वाचे दर्शन घडले आणि हेच समाजातील वास्तव त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. समाजाला नाटकातून असे जळजळीत सत्य बघण्याची सवय नसल्यामुळे त्यांची नाटके सतत वादाच्या भोवऱ्यात सापडली.

  May 17, 2008


लेखसंग्रह

अवडंबर !

Category:

 

गेल्या साठ वर्षांपासून आपला देश अजूनही विकसनशील अवस्थेतच आहे आणि आपल्या मागे असलेले अनेक देश या शर्यतीत आपल्या खूप पुढे गेले आहेत. यामागचे मुख्य कारण आपली मानसिकता हेच आहे. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे, कोणत्या गोष्टींचा संबंध राष्ट्राभिमानाशी जोडायचा याचे आपल्याकडे काही तारतम्यच नाही.

  May 11, 2008