परिचय’ या चित्रपटाची ४९ वर्षे
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानप्रसन्न कपूर निर्मित आणि गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला ‘परिचय’ च्या प्रदर्शनास आज यशस्वी ४९ वर्षे पूर्ण होत आहेत. १८ ऑक्टोबर १९७२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रसन्न कपूर म्हणजे जितेंद्र याचा सख्खा भाऊ होय आणि त्या काळात जितेंद्र आपल्या अभिनयाविषयी गंभीर आहे हे अधोरेखित करण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली अशी चर्चा होती. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर लिबर्टी येथे या चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश संपादले. यात जीतेंद्र, जया भादुरी, प्राण आणि संजीव कुमार मुख्य भूमिकेत आहेत.