माजी व्हाईस ॲडमिरल भास्कर सदाशिव सोमण
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteगोवा मुक्ती संग्रामातील ‘ऑपरेशन विजय’ मोहिमेत नौदलाची सर्व जबाबदारी सोमणांकडेच होती. भास्कर सोमण हे भारताचे दुसरे नौदलप्रमुख. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची रॉयल इंडियन मरिनसाठी निवड झाली आणि त्यांना प्रशिक्षणासाठी ग्रेट ब्रिटनला पाठविण्यात आले. अडीच वर्षांच्या प्रशिक्षणानंतर ऑगस्ट १९३४ ला सब लेफ्टनंट म्हणून ते तत्कालीन भारतीय नौदलात प्रविष्ट झाले. १९३९-४० दरम्यान दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते फर्स्ट लेफ्टनंट होते.
March 30, 2022