कथा

शंभर मैलांवरची माती (कथा)

Category:

 

फुलांचा पंचवीस हजारांचा ताटवा काळ्या लाकडी पेटीवजा कुंडीत ठेवलेला होता. खऱ्या फुलांची ही दफनपेटीच म्हणायला हवी. वर्ष वर्ष डांबराच्या गोळ्यांसारखी उग्र वास देणारी तैवानी फुलं हवीत की, क्षणभर फुलून दिवसांचा गजरा सकाळी मावळणारी फुल हवीत, हे प्रत्येकान आपल्याशी ठरवायला हवं.

कथा

चतुर्भुज गोमु (गोमुच्या गोष्टी – क्रमांक २०)

Category:

 

गोमुच्या आणि परीच्या प्रेमप्रकरणाची सुरूवात मी तुम्हांला सांगितली.
पण माणूस योजतो तसंच सर्व तडीस गेलं तर आयुष्य किती सोपं होईल. कांहीजणांच म्हणणं असतं की आयुष्य आपणच कठीण करत असतो. आपला दृष्टीकोन सकारात्मक असला की अर्धा भरलेला ग्लास दिसतो आपल्याला. अर्धा रिकामा आहे हे जाणवत नाही वगैरे, वगैरे. पण ज्याच्यावर प्रसंग येतो, त्यालाच त्याची गंभीरता कळते. इतरांना “त्यात काय एवढं !” असंच वाटतं.

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

जलसंपत्ती दिन

Category:

 

पाणी नियोजन व व्यवस्थापनाबाबत आज आपण एका दुहेरी कोंडीत सापडलो आहोत. एकीकडे ८० हजार कोटींहून (आजच्या किमतीने तीन लाख कोटी) अधिक रक्कम खर्च करून आपण राज्यातील एकूण लागवड जमिनीच्या १० टक्केदेखील क्षेत्र प्रत्यक्षात पाटपाण्याने ओलित करू शकत नाही हे कटू सत्य आहे.

दिनविशेष

जागतिक पेंग्विन दिन

Category:

 

टार्क्टिका खंडात आढळणारा आणि उडता न येणारा एक पक्षी. स्फेनिसिडी कुलातील पक्ष्यांना ‘पेंग्विन’ म्हटले जाते. या कुलात त्याच्या १७ जाती असून मुख्यत: अंटार्क्टिका, अर्जेंटिना, चिली, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी तो आढळतो. सागराचे उबदार पाणी त्यांना मानवत नसल्यामुळे ते उत्तर गोलार्धात पोहून जात नाहीत. एंपरर पेंग्विन हा आकाराने सर्वांत मोठा असून त्याचे शास्त्रीय नाव ॲप्टेनोडायटिस फॉर्स्टेरी आहे. त्याची उंची सु. १२० सेंमी. व वजन सु. ४५ किग्रॅ. असते. लिटल पेंग्विनाचे शास्त्रीय नाव युडिप्टुला मायनर आहे. त्याची उंची सु. ३० सेंमी. व वजन सु. १•५ किग्रॅ. असते. अन्य जातींच्या पेंग्विनांची उंची ४५–९० सेंमी. व वजन २•३–६•८ किग्रॅ. असते. पेंग्विनाची एक जाती गालॅपागस पेंग्विन ही विषुववृत्तावर आढळते.

लेखसंग्रह

तथास्तू !

Category:

 

त्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात उगाचच हॉर्न वाजवत गाडी फिरवायला सुरुवात केली. संतपूर सरांना हे पटले नाही. त्यांनी गाडीजवळ जाऊन त्यांना ठाम शब्दात समज दिली की “हा महाविद्यालयाचा परिसर आहे आणि सध्या परीक्षा सुरु आहेत. तुम्ही आमच्या आवारात येऊन गोंधळ घालू नका”.

दिनविशेष

सुवेझ कालव्याच्या बांधकामाची सुरुवात

Category:

 

सुवेझचा कालवा हा मानवाने निसर्गाच्या रचनेत केलेला पहिला महत्त्वाचा बदल. सैद बंदर ते सुवेझ येथील तेवफिक बंदर यांना जोडणाऱ्या या कालव्याची लांबी तब्बल १९३.३० कि.मी. म्हणजे जवळपास मुंबई ते पुणे इतकी आहे. पण त्यामुळे बोटींचा सुमारे सात हजार कि.मी.चा आफ्रिकेचा वळसा वाचतो. अर्थात सुवेझच्या बांधकामाला सुरुवात करण्याचा उद्देश केवळ सागरी प्रवासातील वेळेची बचत व त्यामुळे युरोप व आशियातील व्यापारत वाढ व्हावी, इतकाच नव्हता. अरब राष्ट्रे व अन्य जग यांच्यातील विकोपाला जाणारे संबंध आणि त्याचा तेल व्यापारावर होणारा परिणाम, त्यामुळे पाश्चिमात्य देशांचे अरब राष्ट्रांवर वाढत चाललेले आर्थिक अवलंबन यांची किनारही सुवेझ कालवा तयार करण्यामागे होती.

कथा

चिनी मकाव (कथा)

Category:

 

चायनीजच वेड किती आहे सांगायलाच नको. प्रत्येकाला वाटत, एकदा तरी चायनीज जेवण जेवाव. पण अस्सल चायनीज लोक मुंबईत भरपूर आहेत. पण ते शोधायला हवेत. गेली तीन-चार पिढया ही चायनीज मंडळी मुंबईत स्थायिक आहेत आणि उत्कृष्ट  बम्बय्या हिंदी बोलतांत. शोधा म्हणजे सापडतील.