व्यक्ती-परिचय

भारतीय फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना

Category:

 

प्रसन्ना यांनीच भारताला परदेशी भूमीवरचा आपला पहिला टेस्ट सिरीज विजय न्यूझीलंडमध्ये मिळवून दिला. त्या सिरीजमध्ये त्यांनी एकूण २४ विकेटस काढल्या होत्या. कारकिर्दीतल्या १०० विकेट्सचा टप्पा गाठायला त्यांना अवघ्या २५ मॅच लागल्या. तो देखील एक विश्वविक्रम ठरला होता, जो पुढे त्यांचा वारसदार समजल्या जाणाऱ्या आर. अश्विनने पन्नास वर्षांनी मोडला.

  May 27, 2022


व्यक्ती-परिचय

भारतीय प्रबोधनाचे जनक राजाराम मोहन रॉय

Category:

 

राम मोहन बाबू स्मशानात जाउन सती जाणार्याथ स्त्रीयांच मन वळवायचा, त्यांना सती जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत. ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीन १७९८ साली कलकत्त्यामधे सर्वप्रथम सतीबंदी कायदा लागू केला. परंतु हा फक्त कलकत्ता शहरापुरताच लागू होता. त्यानंतर विल्यम कॅरे हा ख्रीश्चन मिशनरी आणि विल्यम विल्बरफोर्स या दोघांनी सती प्रथेविरुद्ध आंदोलन आणि प्रचार सुरु केला. याची दखल घेउन कंपनी सरकारन १८१३ मधे सती जाणाऱ्या स्त्रीयांची मोजणी सुरु केली.

  May 27, 2022


व्यक्ती-परिचय

सिलोन रेडिओचे निवेदक गोपाल शर्मा

Category:

 

गोपाल शर्मा’ यांनी काही खास शब्द वापरात आणले. ‘आवाज की दुनियाके दोस्तो’ हा शब्दप्रयोग त्यांचाच. (त्यांच्या आत्मचरित्राचं नावही हेच आहे. ) ‘शुभाशिष’, ‘शुभरात्री’, ‘बंधूवर’ हे शब्दही त्यांनीच प्रथम रेडीओवर आणले.
‘शहाजहाँ’ चित्रपटातील कुंदनलाल सैगल यांच्या एका गीतात, महंमद रफींचा अल्प सहभाग आहे. ‘अपनी पसंद’ या कार्यक्रमात गोपालजींनी हे गाणं लावलं आणि रफीचा आवाज असलेली ती ओळ त्यांनी श्रोत्यांना लागोपाठ तीन-चार वेळा ऐकवली.

  May 27, 2022


व्यक्ती-परिचय

वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई

Category:

 

त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात टाइम्स ऑफ इंडियापासून केली आणि वयाच्या २६ व्या वर्षी ते मुंबई आवृत्तीचे सिटी संपादक होते. सहा वर्षे टाईम्स ऑफ इंडिया मध्ये नोकरी केल्यावर राजदीप सरदेसाई यांनी १९९४ मध्ये न्यू दिल्ली टेलिविझन (एनडीटीव्ही) मध्ये संपादक म्हणून नोकरीला सुरुवात करून टेलिव्हीजन पत्रकारिता मध्ये त्यांनी पदार्पण केले. आपली स्वत: ची कंपनी ग्लोबल ब्रॉडकास्ट न्यूज (जीबीएन) तयार करण्यासाठी त्यांनी एनडीटीव्ही सोडली.

  May 27, 2022


व्यक्ती-परिचय

प्रख्यात मल्ल गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव

Category:

 

वस्ताद जुम्मादादांचे शिष्य व अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव करणाऱ्या माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक व शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमध्येही त्यांनी गावोगावी व्यायामशाळा स्थापन केल्या.

  May 27, 2022


व्यक्ती-परिचय

आकाशवाणीवरील वनिता मंडळ आणि नाटय़ विभागाच्या निर्मात्या उमा दीक्षित

Category:

 

सामाजिक, कौटुंबिक, आरोग्यदायी जाणिवांचे प्रतिबिंब वनितामंडळाच्या विविध कार्यक्रमांतून आणि नभोनाटय़ाच्या निर्मितीतून घडू लागले. ‘अहो प्रपंच’ ही कौटुंबिक मालिका, ‘मंत्र जगण्याचा’ ही ९५ भागांची दीर्घमालिका, रंगभूमीचा इतिहास सांगणारे ‘असं घडलं नाटक’ व ‘किस्से रंगभूमीचे,’ ‘या चिमण्यांनो परत फिरा रे,’ ‘पैठणी’, ‘मातृरूपेण’, ‘विठूच्या या तुळशीच्या मंजिऱ्या’, ‘लेकीचा गं जलम’, ‘स्वयंप्रकाशिता’ अशा असंख्य मालिकांतून अनेक विषय हाताळले.

  May 27, 2022


साहित्य - ललित

प्रदर्शन

Category:

 

जवळपास दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जोडपं “गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन” बघण्यासाठी गेलं. तसं पूर्वी जाणं व्हायचं बरेचदा तेव्हा त्याचं इतकं काही कौतुक वाटायचं नाही पण या मधल्या सगळ्या कोरोना प्रकरणामुळे चार माणसांत फिरायला जाणं दुर्लभ झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनाला जाण्याचा आज एक वेगळाच उत्साह होता. त्याच आनंदात दोघेही आत शिरले. सगळे तसेच पूर्वीसारखे स्टॉल. तीच लगबग. अनेक महिन्यांनी जुनं चित्र डोळ्यासमोर बघून दोघांनाही खूप बरं वाटलं. स्टॉलच्या दोन रांगांमधलं किंचितसं वाढलेलं अंतर आणि काही जणांच्या चेहऱ्यावर मास्क या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळं पूर्वीसारखंच .

  May 27, 2022


दिनविशेष

अमर अकबर ॲ‍न्थनी’ चित्रपटाची ४५ वर्षे

Category:

 

मनमोहन देसाईं यांनी या चित्रपटात आपला लाॅस्ट ॲ‍ण्ड फाऊंड हाच हुकमी फाॅर्मुला वापरला. लहानपणी हरवलेले तीन भाऊ मोठेपणी योगायोगाने आपल्या आई पित्यासह भेटतात, आणि ते खलनायकाचा निप्पातही करतात. ही त्यांची हुकमी थीम या चित्रपटात सर्वधर्मसमभाव पध्दतीने मांडली. या चित्रपटातील तीन भाऊ एकाच वेळेस आपल्या आईला रक्तदान करतात असाही एक हास्यास्पद प्रसंग या चित्रपटात आहे. पण प्रेक्षकांना तेही आवडले.

  May 27, 2022