कथा

वेगळा (कथा) भाग ७

Category:

 

बस ५० ते ६० किलोमीटर वेगाने पळत जरी असली तरी, बाबू च हृदय मात्र १०० च्या पुढे पळत होत, पाऊस रिप रिप करू लागला होता , घाई गडबडीत छत्री , रेनकोट काहीच सोबत घेतलं न्हवत ,आपण काय करायला जातोय, त्याचा काय परिणाम होईल, ह्याची जाणीव आणि त्यातून उत्पन्न होणारी भीती त्याच्या मनाला त्रास देत होती , पण तरीही तो मागे हाटत न्हवता , का ?ह्याचं त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटत होत , एकदाच वाकड आल, पावसाने आता भलताच जोर धरला होता , वाकड तर खूप मोठ होत आता पुढे काय करायचं नेमक तीच घर आपल्याला कस सापडणार , निघताना तर आपण मोठ्या उत्साहात निघालो आणि मुर्खा सारखा तिचा पत्ताही माहित नसताना तिच्या गावात आलोय , ह्या पावसाला पण आताच वेळ मिळाली होती कोसळायला , शी …हे दप्त्तर आपण का सोबत आणलंय, अशोक कडे द्याव अस का नाही सुचल आपल्याला , मुळात आपण असे कोणत्या ठाम विचारावर आलोय हे समजत नाहीये काय कराव काहीही कळत न्हवत. तो हताशपणे एसटी थांब्याच्या नजीक चहाच्या टपरीवर च्या आडोश्याला उभा होता , इथे तिथे शोधक नजरेने आसपास चा परिसर न्हाहळू लागला . कदाचित त्याला बायडा दिसेल अश्या खोट्या आशेवर तो चलबिचल होत होता .

  July 24, 2022


परिचय – परिक्षण

वैज्ञानिकाचा सत्याचा शोध – मनोगत

Category:

 

मी प्रदीर्घ साधना आणि कसोटीच्या काळात गेलो ज्यांचा संदर्भ आवश्यक आहे. याशिवाय सर्वसंग परित्याग, मुक्तीची अतीव ओढ, भक्ती, योग्य गुरू या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्या विचारात घेतल्याच पाहिजेत. या गोष्टी विचारात घेतल्या तरच पुस्तकातील विचारांना अर्थ राहील आणि वाचकांना त्याचा लाभ होईल.

  July 23, 2022


लेखसंग्रह

सामना’ चित्रपटातील मास्तर

Category:

 

चित्रपटाच्या सुरवातीचा दारुड्या, मध्यंतरी सुधारलेला व हिंदुरावांच्या फॅक्टरीत काम करणारा विश्वासू पण शेवटी सत्याचा छडा लागावा यासाठी उपोषण करणारा एक चळवळ्या माणूस ही जी रेंज डॉ. लागूंनी दाखवलीय, तिला तोडच नाही.

  July 23, 2022


साहित्य - ललित

खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी (आठवणींची मिसळ ३)

Category:

 

ज्योतिष, पत्रिका, ग्रह ह्या सगळ्या अंधश्रध्दा आहेत असं तर्काधारे कितीही समजवून दिलं तरी माणसाच्या मनांत भविष्यात काय घडणार याचं कुतूहल असतचं. त्याचा गैरफायदा घेतला जातो.पण कांही कांहीच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींचा विचार केला तर वाटतं की खरंच असं कांही नसेल?

  July 23, 2022


लेखसंग्रह

स्वातंत्र्यवीरांचे मुंबईतील वास्तव्य – सावरकर सदन

Category:

 

शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या निवासाने पावन झालेली इमारत इतिहासाची आजही साक्ष देते. ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचं नव्हे तर साऱ्या देशवासियांचे श्रद्धास्थान आहे. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या या वास्तूला तसा इतिहास आहे आणि ही वास्तू म्हणजे हिंदुस्थानवासींना नवविचारांसह दिशादर्शन करणारे प्रेरणास्थान ठरले आहे. शिवाजी पार्क येथे गेल्यावर डॉ. मधुकर बी. राऊत मार्गावर ‘बालमोहन विद्यामंदिर’ शाळेच्या बाजूला गेल्यावर पांढऱ्या रंगाची इमारत आपल्याला समोर दिसते.

  July 23, 2022


साहित्य - ललित

एअरपोर्ट

Category:

 

लहानपणी परळच्या आमच्या आर.ए.एम. भट हायस्कूल समोर फेरीवाल्यांचा गराडा पडलेला असे. मधल्या सुटीत आणि शाळा सुटल्यावर त्याच्या टोपलीतल्या आणि गाडीतल्या खाण्यांवर ताव मारण्याची कला मी बालवयातच आत्मसात करुन घेतली. अर्थात घरच्यांनी रोज आणा दोन आणे हातावर ठेवून या छंदाला खतपाणीच घातलं.

  July 23, 2022