साहित्य - ललित

बाबल्याची गोष्ट – भाग २ (आठवणींची मिसळ २)

Category:

 

एव्हाना मी कथा लिहायला लागलो होतो.अनेकांनी मला बाबल्यावर कथा लिही म्हणून सांगितलं.मीही त्या घटनांचा अनेक अंगानी विचार केला.पण वरील दोन प्रश्न समाधानकारक रित्या सुटल्याशिवाय बाबल्याची गोष्ट पुरी होऊ शकत नाही हे माझ्या लक्षांत आलं.मी लहानपणी ऐकलेल्या, पाहिलेल्या गोष्टींचे दुवे वेगवेगळ्या प्रकारे जुळवून पाहिले.बाबल्या आणि त्याच्या वयाच्या, म्हणजे पंधरा ते सतराच्या, मुलांना नको त्या अवस्थेत पाहिलं होतं.पौगंडावस्थेतील मुलांची लैंगिक सुखासाठी चाललेली धडपड (विकृत, कुणास ठाऊक ?) माझ्या दोन तीनदा दृष्टीस पडली होती.मी तेव्हां लहान होतो.पण त्याचा अर्थ नंतर चांगला कळून आला होता.मग बाबल्याच्या आईच्या जीव देण्याचा संबंध त्या मानसिकतेशी होता काय ?बाबल्या आणि त्याची आई यांच्या संबंधात बाबल्याच्या हातून अशी कांही लाजीरवाणी गोष्ट घडली होती काय ?थोड्या रासवट, थोराड, भोळसर बाबल्याने अनावर लैंगिक वासनेपायी एकाच खोलीत झोपणाऱ्या आईला लाजीरवाणं वाटाव असा अतिप्रसंग तर केला नसेल ना ?

  July 21, 2022


कथा

वेगळा (कथा) भाग ४

Category:

 

नेहमी प्रमाणे बाबू शाळेत अशोकला भेटत होता , आणि कधी कधी तो त्याची इच्छा नसताना देखील अशोक सोबत डोंगरावर जाई, त्याला कळत नसे हे दोघ इतक्या लांब येऊन का भेटतात ते पण चोरून काय गरज असेल , आणि मुळात मला लांब का बसवतात , एकदा बाबू असाच अशोक सोबत गेला असताना बराच वेळ अशोक आणि सरिता बोलत बसले होते , बाबुला बसून बसून पाठीला रग लागली म्हणून तो उठला त्याने त्याचे दोन्ही हात वर ताणून धरले आणि त्याच वरच शरीर उजव्या बाजूला ताणल आणि अचानक त्याच लक्ष अशोक आणि सरिता कडे गेल , आणि पाहतो तर काय अशोक आणि सरिता एकमेकांना मिठी मारून बसले होते , त्याने लगेच त्याची नजर फिरवली , का जाणे त्याला आपण काहीतरी चुकीच पाहिलं म्हणून अपराध्या सारख वाटायला लागल , तो तसाच सुन्न अवस्थेत बसून राहिला , आणि काही वेळातच अशोक ची पाठीवर पडलेली थाप पडताच भानावर आला.

  July 21, 2022


साहित्य - ललित

गुरुदक्षिणा

Category:

 

आज हे पत्र लिहायलाच हवं. एक वर्ष उशीर झालाय. मागील गुरुपौर्णिमेला संकल्प सोडला होता या पत्राचा आणि वर्षभरानंतर तो पूर्ण होतोय. उशिराला कारण काहीच नाही. सारंगकडून तुमचा पत्ता मिळाला पण तो लिफाफ्यावर असणार. आतमध्ये काय? हे सगळं “आतलं ” तुमच्यासारख्या गुरुजनांनी दिलेल्या ओसंडून वाहणाऱ्या पोतड्यांची देणगी आहे. हे व्यक्त व्हायला गुरुपोर्णिमेसारखा मुहूर्तच हवा.

  July 21, 2022


लेखसंग्रह

श्रीगुरुस्तवन

Category:

 

ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरु हा कृपामयी आहे. कैवल्याचे सोने प्रत्येकाच्या पदरात टाकणारा विश्वउदार आहे. तो विचारश्रीमंत आहे. आचारश्रीमंत आहे. तो विवेक श्रीमंतही आहे. इतकेच नव्हे तर सद्गुरु हा खरा सामर्थ्यवान आहे. सद्गुरु हा इतका सामर्थ्यवान आहे की प्रत्येक शिवाचेही सामर्थ्य तो आपल्या केवळ कैवल्य-अस्तित्वाने जिंकून घेतो. कारण एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे ती ही की शिव हा निराकारात स्थिर आहे. त्याचे सामर्थ्य हे त्याच्या भक्तांच्या सामर्थ्याच्या तुलनेतच त्या भक्ताकडून तोलले जाते. परंतु सद्गुरुचे सामर्थ्य दृश्य आहे आणि ते काही शिष्यांच्या सामर्थ्यदृष्टीकोनातून कधी तोलले जात नाही तर तो स्वयंभू सामर्थ्यवान आहे.

  July 21, 2022


कथा

फिस्ट ऑफ गॉड

Category:

 

काम संपल्यावर कँन्टीमध्येच पुस्तक वाचत तो रात्र रात्र जागतो, असे त्याचे इतर सहकारी सांगत. बघता बघता रात्रीची शाळा करुन त्याने दहावी पूर्ण केली. रात्रीच कॉलेज सुरु केल. ऑफिस संपल्यावर बसल्याबसल्या टायपिस्टकडून टायपिंग शिकला. अडीअडचणीला टायपिंगची मदत करु लागला. टायपिंगची परीक्षा पास झाला.

  July 21, 2022