लेखसंग्रह

रंग काळा

Category:

 

आपली काळया रंगाशी सोबत अगदी जन्मल्यापासून असते. पूर्वी आणि काही प्रमाणात आजही नवजात बाळाला न्हाऊ माखु घातल्यावर कानाखाली काळं तीट आणि घरात पाडलेलं काजळ, डोळे भरून लावलं जायचं. काळं तीट दृष्ट लागू नये म्हणून आणि काजळ डोळ्यांची निगा राखायला.
पुढे शाळेत जायला लागल्यावर सोबत असणारी काळीकुट्ट सिंगल किंवा डबल पाटी. त्या पाटीवर सर्वप्रथम श्री हे अक्षर काढायचं. स्पंजपेटी दप्तरात बाळगायची.

  September 15, 2022


साहित्य - ललित

इस्त्रीवाला (आठवणींची मिसळ २६)

Category:

 

आता इस्त्रीवालेही मोठे झालेत. एखाद्या मोठ्या खोलीत, एखाद्या मोठ्या दुकानांत आतां दोन ते तीन टेबलांवर इस्त्री चालू असते. बरेच इस्त्रीवाले आता बरोबरीने लाँड्री चालवतात. लाँड्रीचा धंदा कमी झाला तरी त्याची गरज आहेच. हा धंदा हळूहळू इस्त्रीवाले ताब्यात घेतायत. वूलन कपडे, सिल्कचे कपडे इ. चे ड्राय क्लिनींग असते. डिझायनर ड्रेससारखे कपडेही साफ करायला येतात. मुंबईत तरी इस्त्रीवाल्यांनी बहुसंख्यांचे कपड्यांची जबाबदारी आपल्यावर घेतली आहे.

  September 15, 2022


लेखसंग्रह

धर्माधिकारी गुरुजी

Category:

 

आमच्याकडे धार्मिक विधी, नैमित्तिक पूजा अर्चा, एकादष्णी ,संकष्टी, श्रावणमासातील पूजा हे नित्याचच होतं. त्या लहानशा घरातला एक कोपरा देवघराने भरलेला होता. तात्यांची रोज भल्या पहाटे उठून पूजा चालायची. त्यांचं आध्यात्मिक पुस्तकांचं वाचनही प्रचंड होतं. घरात इतरही साहित्य संग्रह प्रचंड होता. थोडक्यात सांगायचं तर वाचन श्रीमंती भरपूर होती.

  September 14, 2022


साहित्य - ललित

प्रेम

Category:

 

भारतात प्रेमकथा फक्त त्यागाच्याच ऐकायला मिळतात, किंबहुना प्रेम म्हणजे त्याग, दुःख त्रास हे समिकरण इतके जोडले गेले आहे की त्या त्यागाने प्रेमाला बदनाम केले आहे. रामाची सीता, अहिल्या, लोपामुद्रा पासून ते थेट मुमताज महल पर्यंत सगळ्या कथा फक्त त्रास त्रास आणि त्रासाच्याच आहेत. खरंतर प्रेम हे जगणं आहे, प्रेमात आनंद आहे चैतन्य आहे पण या वेड्या त्यागाने प्रेमातली प्रेरणाच संपवून टाकली आहे.

  September 14, 2022