केशरी, श्वेत, हरित
ध्वज समृद्धी तिरंगा
सौखसुखदा भारताची
मांगल्य ध्वज तिरंगा….
अस्मिता भारतीयांची
ध्वज अभिमानी तिरंगा
शौर्यशक्ती, बलिदानाचे
सत्य रूपक हा तिरंगा…..
ही जन्मभूमी देवतांची
साक्ष संस्कृतीची तिरंगा
श्वासाश्वासात देशभक्ती
रुजवीतो हाच तिरंगा….
जगतवंद्य जगतवंद्य
शांतीदूत राष्ट्रध्वज तिरंगा
वंदे मातरम, वंदे मातरम
मुक्त फड़कवुया तिरंगा….
–वि.ग.सातपुते .(भावकवी)
9766544908
रचना क्र.१९७
१३/८/ २०२२
Author
Post Views: 17