अठरा हाताचा गणपती
लेखसंग्रह

अठरा हाताचा गणपती

Category:

 

रत्नागिरी शहरातील आंबराई वरची आळी या भागात १८ हात असलेल्या गणपतीचे मंदिर असून महाराष्ट्रातीलच नव्हे जगात पहिलेच गणेश मंदिर आहे. १८ हात असलेली श्री गणेशमूर्ती फक्त रत्नागिरी जिल्ह्यातच आहे. हे गणेशाचे मंदिर कै. विनायक कृष्ण जोशी यांनी स्वतःचे मालकीचे ठिकाणात स्वखर्चाने बांधले आहे.

लेखसंग्रह

माझी ऊर्जा

Category:

 

कुणी आंबेडकरप्रेमी भेटला की मला ऊर्जा प्राप्त होते. कोणी कामाची दखल घेतली, प्रशंसा केली, पुरस्कार केला की ऊर्जा प्राप्त होते व ती काही दिवस टिकते. बाबासाहेबांबद्दल नवीन माहिती मिळाली की आनंद वाटतो. ती कोणाला तरी सांगण्याची ऊर्मी निर्माण होते. हाही एक ऊर्जेचाच प्रकार. त्यातून विचारांची देवाणघेवाण होते.

लेखसंग्रह

घरचा वैद्य

Category:

 

कुटुंबव्यवस्था हे भारताचे बलस्थान आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जे जे काही चांगले, पवित्र, उदात्त आहे ते सर्व स्त्रियांच्या सहभागानेच साध्य झाले आहे. सांस्कृतिक मूल्यांची जोपासना स्त्रियांनीच जास्त प्रमाणात केली. भारतीय स्त्रीकडे पाहिले की अष्टभुजा देवीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गंभीर बनू नका

Category:

 

फार गंभीर बनून जगू नका. हे विश्वकरोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही.

व्यक्ती-परिचय

क्रीडा समीक्षक सुनंदन लेले

Category:

 

आपल्या सर्वांना सुनंदन लेले हे एक क्रीडा समीक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांनी आजपर्यंत क्रिकेट खेळाकरिता आपल्या
लिखाणातून खूप मोठे योगदान दिले आहे.

व्यक्ती-परिचय

ग्वाल्हेर घराण्याच्या जेष्ठ गायिका मालिनी राजुरकर

Category:

 

मालिनीताई राजुरकर या माहेरच्या प्रभा वैद्य. त्यांचे घराणे मूळचे इंदूरचे असले तरी त्यांच्या वडिलांचे नोकरीनिमित्त वास्तव्य अजमेर येथे होते. त्यामुळे मालिनीताईंचे सर्व शिक्षण अजमेर येथेच पार पडले. त्यावेळी अजमेर येथे शाळेमध्ये संगीत शिक्षण सक्तीचे होते. त्यामुळे शाळेतील संगीताचा तासाला जे संगीत कानावर पडे तेव्हढाच त्यांचा गाण्याचा संबंध येत असे.

कथा

साथ

Category:

 

प्रसिद्ध लेखक मंगेश कदम आपल्या केबिनमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या ऑफिसमध्ये एसी फुल्ल असूनही त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. चेहरा सुद्धा आक्रसल्यासारखा दिसत होता. मेजावरच्या ऍश ट्रे मध्ये तीन मोठ्या गोल्डफ्लेक लाइट्स अर्धवट जळालेल्या अवस्थेत होत्या. चौथी सिगरेट अर्धवट पिऊन झालेली त्यांच्या बोटाच्या चिमटीत होती.

व्यक्ती-परिचय

स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार – वसंत गोविंद पोतदार

Category:

 

वसंत गोविंद पोतदार यांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले.पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले.

व्यक्ती-परिचय

भाषा संशोधक तथा राष्ट्रकवी गोविंद पै

Category:

 

गोविंद पै हे आधुनिक कन्नड कवी व एक श्रेष्ठ संशोधक होते. गोविंद पै यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत. विविध भारतीय भाषा, जागतिक वाङ्‌मय, तत्त्वज्ञान आणि इतिहास या विषयांचा त्यांनी स्वयंप्रेरणेने व्यासंग केला. विसहून अधिक भाषा त्यांना उत्तम प्रकारे अवगत होत्या त्यांत ग्रीक व हिब्रू यांचाही समावेश होता. त्यांच्या वाङ्‌मयीन कारकीर्दीचा काल ६० वर्षांहून अधिक होता.

व्यक्ती-परिचय

प्रख्यात मराठी लेखिका मीना देशपांडे

Category:

 

साहित्य सागरातील कोहिनूर हिरा साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांची कन्या मीना देशपांडे.