लेखसंग्रह

आबेल पारितोषिक २०२२

Category:

 

प्रसिद्ध परंतु अल्पायुषी नॉर्वेजिअन गणितज्ञ नील्स हेन्रिक आबेल (१८०२-२९) यांच्या नावाने एक पारितोषिक, २००३ सालापासून दरवर्षी आहे. एका अर्थाने हे पारितोषिक गणिती जीवनगौरव या स्वरूपाचे असून त्या विजेत्याचे एकूण कार्य विचारात घेते, न की एखादे प्रमेय, सिद्धांत किंवा प्रश्न सोडवण्याची पद्धत. पदक आणि ७५ लक्ष नॉर्वेजिअन क्रोनर्स (सुमारे भारतीय रुपये ६,४८,००,०००) असे या पारितोषिकाचे स्वरूप असून, नॉर्वे सरकारच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली जाते.

  October 29, 2023


लेखसंग्रह

टेफ्लॉन

Category:

 

पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरातील तवा किंवा कढया एकतर लोखंडी, पितळी वगैरे धातूंच्या असायच्या पण आता हे जुने तवे किंवा कढयांची जागा अतिशय आधुनिक अशा नॉनस्टिक तवे व फ्राइंग पॅन्सनी घेतली आहे.

  October 28, 2023


लेखसंग्रह

प्लास्टिकच्या डब्यात खायचे पदार्थ

Category:

 

प्लास्टिकच्या डब्यात खायचे पदार्थ किंवा औषधे ठेवली तर ती शरीराला अपायकारक ठरतात का? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. असे डबे पॉलिथिलिनपासून बनवले जातात. पॉलिथिलिन दोन प्रकारे बनवले जाते. हे दोन्ही प्रकार मुळात बिनविषारी प्रकारात मोडतात. पॉलिथिलिनचा मानवी शरीरावर अजिबात परिणाम होत नाही हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. पॉलिथिलिन हे एकमेव प्लास्टिक असे आहे की, ज्यावर कोणत्याही द्रावकाचा (सॉल्व्हंट) परिणाम होत नाही. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर पॉलिथिलिन कोणत्याही द्रावात विरघळत नाही.

  October 28, 2023


लेखसंग्रह

लाइफस्टाइलने जगण्यासाठी

Category:

 

शिक्षणावर शहरी माणूस सर्वात जास्ती खर्च करतो, शिक्षणाचा रोजचा माणशी खर्च दीडशे रुपयांच्या आसपास जातो. स्पेशल ट्युशन्स लावल्या, काही कला किंवा खेळाचे प्रशिक्षण घेतले तर तो खर्च कितीही वाढू शकतो. यामध्ये चार जणांचे कुटुंब गृहीत धरलेले आहे.माणशी रोजचा खर्च पावणे पाचशे ते साडेसहाशे इतका येतो.याच्या पुढचे उत्पन्न हे गुंतवणूक म्हणून वापरता येऊ शकते.

  October 28, 2023


लेखसंग्रह

भिती – एक भयंकर गोष्ट

Category:

 

भिती माणसांच्या विचारांमध्ये असते, ती जगात कुठेही अस्तित्वात नाही. भितीग्रस्त माणूस ज्या गोष्टीला घाबरतो ती गोष्ट सर्वात मोठी समजतो, ज्या गोष्टीला तो घाबरत नाही त्या गोष्टीला तो तुच्छ समजतो. भितीग्रस्त माणूस ज्याची भिती वाटते अशा गोष्टींच्या सूचना अंमलात आणतो, भीतीदायक माणसांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो आणि ज्या गोष्टीची भीती वाटत नाही त्यांना अक्षरशः नजरअंदाज करतो.

  October 28, 2023


व्यक्ती-परिचय

गायिका सुषमा श्रेष्ठ

Category:

 

आजच्या पार्श्व गायिका पूर्णिमा म्हणजेच सुषमा श्रेष्ठ होत. सुषमा श्रेष्ठ या संगीतकार भोला श्रेष्ठ यांच्या कन्या होत. सुषमा श्रेष्ठ यांनी बाल गायिका म्हणून गायलेली ‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई’ व ‘क्या हुआ तेरा वादा’ खूपच गाजली होती.

  October 28, 2023


लेखसंग्रह

सनग्लासेस

Category:

 

सनग्लासेस म्हणजे गॉगल हे सूर्याच्या प्रखर किरणांपासून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करणारे एक साधन आहे. प्रदूषणापासूनही त्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते. सनग्लासेसमुळे स्त्री-पुरूषांचे व्यक्तिमत्त्वही खुलून दिसते.

  October 27, 2023


लेखसंग्रह

आणखी काही प्लास्टिक

Category:

 

इथिलीन ऑक्साइड व हायड्रोजन साइनाइड यांपासून अॅक्रिलोनायट्रिल बनते. त्यात स्टायरिन मिसळून स्टायनि अॅक्रिलोनायट्रिल बनवता येते. हे मिश्र प्लास्टिक पिवळसर असते. हे पूर्णपणे पारदर्शक असते.

  October 27, 2023


लेखसंग्रह

पाश्चिमात्य जगत आणि आत्मनिर्भरतेचा जागर

Category:

 

राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद किंवा विश्ववाद रायचा आकडा. राष्ट्रवादात यांच्यात छत्तीसचा राष्ट्र प्रथम, देशाच्या सीमांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे, उद्योगांचे आणि आस्थापनांचे हित प्रथम त्यासाठी स्वदेशीला प्राधान्य; आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट… कारण देश आत्मनिर्भर झाला तरच तो जागतिक महासत्ता होऊ शकेल हा विश्वास.

  October 27, 2023