भारतीय निवडणुका आणि माओवाद्यांचा वाढता हिंसाचार
Category:
लेखसंग्रहभारतासारख्या बलाढय़, खंडप्राय देशाला मूठभर माओवादी आव्हान देतात, हवा तेव्हा हिंसाचार घडवून दहशत निर्माण करतात ही लाजिरवाणी बाब आहे. भारतीय लोकशाहीला माओवाद हा सर्वांत मोठा धोका आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक गाव दहशतीपासून मुक्त व्हावे, असा संकल्प घेण्याची आवश्यकता आहे. माओवादाविरुद्धची लढाई ही अशी अनेक आघाड्यांवर आणि दीर्घकाळ लढावी लागणार आहे.