पोपट पोपटीण आणि जोशीकाका
Category:
साहित्य - ललितपुण्याच्या सदाशिवात आमच्या जुन्या घराजवळच्या डेरेदार वृक्षावरच्या ढोलीत पोपट आणि पोपटीणीनी संसार थाटला होता. दिवसभर ढोलीत येणा-या जाणा-यांचा राबता असायचा; जॉइंट फँमिली असावी कदाचित किंवा समाज कल्याणासाठी पोपट दांपत्यानी हिरव्या मिरच्यांचा मोठ्ठा साठा करुन ठेवला असेल येणार्या जाणार्यांसाठी आणि तेही नसेल तर मात्र पोपटीण दिसायला सुंदर असणार हे नक्की.