युरोपायण पाचवा दिवस – रोटरडँम – अँमस्टरडँम – कोलोन
Category:
साहित्य - ललितरोटरडँम, म्हणजेच हॉलंड किंवा नेदरलँडमधील, डच लोकांच्या शहरात येता येताच नदी, त्यावरील ब्रिज आणि बाहेरुन विशिष्ट बारीक बारीक टायलींग असलेल्या 8-10 मजली इमारती पाहून खूप छान वाटल; लंडन, पँरीस, ब्रुसेल्सहून डचांच वेगळेपण नक्कीच जाणवल. बहुतेक घरांना बाल्कनी किंवा टेरेस होत्या. रस्तेही भव्य आहेत. ब्रेकफास्ट आवरुन हॉलंडच मिनी व्हर्शन, मदूरोडँम, बघायला जायच ठरल.