लेखसंग्रह

अमस्टरडॅम, रोटरडॅम आणि सिक्स ऑन सिक्स ऑफ.

Category:

 

लूफथान्साच्या विमानाने मुंबई विमानतळावरून टेक ऑफ घेतला आणि फ्रँकफर्ट विमानतळावर लँड केले. तिथून अम्सटरडॅम साठी कनेक्टिंग फ्लाईट पकडली. युरोप मध्ये बऱ्याच देशांमधे रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नो फ्लाय टाइम असतो म्हणून युरोप किंवा अमेरिकेत जाणारी विमाने भारतातून मध्यरात्री नंतर पहाटे पहाटे निघतात जेणेकरून सहा ते सात तासानंतर विमानतळाजवळ राहणाऱ्या यूरोपियन लोकांची झोपमोड न होता विमाने लँड करु शकतील.

लेखसंग्रह

डबल डेकर

Category:

 

गेट वे ऑफ इंडिया वरून मांडव्याला जायला लहान असताना लाँच सर्विस चालू नव्हती झाली. मांडव्याला मामाकडे जायला लोकल ने भायखळा किंवा डॉकयार्ड रोड स्टेशनवर उतरून भाऊच्या धक्क्यावर जाऊन रेवस ला जाणाऱ्या लाँच ने जावे लागायचे. भाऊच्या धक्क्यावर जायला तेव्हा बेस्ट च्या डबल डेकर बस असायच्या.

लेखसंग्रह

मसिना स्ट्रेट

Category:

 

जहाजाचे रात्री दोन अडीच च्या सुमारास कधीतरी डिपार्चर झाले होते. रात्री लोडींग मुळे 8 ते 12 चा वॉच संपवून केबिन मध्ये गेल्या गेल्या लगेच झोप लागली होती. रात्री जहाजाचे जेटीवरून निघताना इंजिन मुव्हमेंटमुळे आणि टग बोट ने जहाजाला खेचतानाचे धक्के जाणवले होते पण झोप एवढी आली होती की थोड्या वेळाने इंजिन फुल्ल स्पीड मध्ये जा ताना जाणवणारे व्हायब्रेशन आणि हादरे पण कळले नाहीत.