लेखसंग्रह

ती अभागी…!

Category:

 

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रात शाळेतील क ख ग तर तिच्या ओठीही नाही…! पुढाऱ्यांच्या बॅनर वरच्या मोठमोठ्या निर्जीव माणसांकडे पाहात पाहात, नशिबाचं गाणं गात गात ती गर्दीत कुठे आणि कधी हरवून जाते माहीत नाही…!

  November 24, 2019


लेखसंग्रह

बाबाजी, उल्लूचें

Category:

 

तर साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे, आमच्या ऑफिसमधला संपतराव नऊ महिन्याची पोटुशी बायको (स्वतःची) घेऊन दवाखान्यात जाताना मला भेटला. संपत खरंतर देव माणूस, तीन पोरींचा बाप, तुटपुंज्या पगारात पण अगदी सदानंदी. पण घरच्यांच्या  ‘पोराच्या’ नादापायी हे दवाखान्याचे खेटे घालतोय. मला त्याची कीव आली. मी  अगदी चालत चालत सहज बोललॊ “संपतराव, ह्या वेळी नक्की पुत्रप्राप्ती आहे. बिनघोर राहा”. हे ऐकून संपतराव आणि परिवार जाम खुश झाले  आणि माझ्या हातात पेढा देण्याचा तेवढ बाकी ठेवून छान हसले.

  November 24, 2019


लेखसंग्रह

भारताची सागरी सुरक्षा : सद्य परिस्थिती आणि उपाय योजना

Category:

 

26 नोव्हेंबर 2019 ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला अकरा वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेचे अवलोकन केले पाहिजे. गेल्या पाच वर्षात सागरी सुरक्षेमध्ये काय सुधारणा झाल्या, सध्याची परिस्थिती कशी आहे आणि येणाऱ्या काळात अजून काय जास्त सुधारणा करणे गरजेचे आहे या सगळ्या विषयावर चर्चा होणे जरुरी आहे.

  November 24, 2019


लेखसंग्रह

कनाक्काले

Category:

 

जहाज ट्युनिशिया देशातील ला बिझर्ते आणि ला गुलेट या दोन पोर्ट मध्ये कार्गो डिस्चार्ज करून काळया समुद्राकडे निघाले होते. ला गुलेट आणि ला बिझर्ते या पोर्ट प्रमाणेच ट्युनिशिया या देशाचे नाव सुद्धा त्या देशात जाईपर्यंत कधी ऐकले नव्हते. तस पाहिलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश बऱ्यापैकी मोठा आहे पण ज्याप्रमाणे गरीब, निरुपद्रवी आणि शांत लोकांबद्दल जसं कोणाला काही माहिती नसतं किंवा त्यांच्याबद्दल फारसे कोणी बोलत नाही किंवा चर्चा करत नाही असा प्रकार ट्युनिशिया सारख्या अनेक देशांबद्दल घडत असावा याची जाणीव झाली.

  November 24, 2019


लेखसंग्रह

आत वेगळा बाहेर वेगळा

Category:

 

आपण जसे बाहेरच्या जगासमोर असतो ना, तसे आपल्या आतल्या जगात नसतो. बाहेरच्या जगात मला एखाद्या गोष्टीचा राग येत असेल तर मी व्यक्त होत नाही, मात्र आतल्या आत व्यक्त होत राहतो… अगदी स्पष्टपणे…

  November 24, 2019


लेखसंग्रह

एनआरसी’ ची अवघड वाट !

Category:

 

देशातील सगळ्या नागरिकांची नेमकी ओळख पटवणे, त्यांची वर्गवारी करणे, त्यातील बेकायदा रहिवाशांना शोधून काढणे ही प्रक्रिया अंत्यत्न किचकट आणि वेळखाऊ ठरणार हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे यासाठी स्पष्ट धोरण असायला हवे. देशातील आभारतीयांचा शोध घेऊन त्यांचं काय करायचं? याचीही धोरणनिश्चिती झाली पाहिजे. स्पष्ट धोरणाशिवाय प्रक्रियेला सुरवात झाली तर ती वाट फार बिकट राहील, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे…!

  November 24, 2019