लेखसंग्रह

पारंपारिक अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान : पूर्ण ब्रम्ह.

Category:

 

आपलं अध्यात्म गेल्या सुमारे ५००० वर्षांपासून गोठलं आहे. त्यात अुत्क्रांती झालीच नाही. आता विज्ञानानं, निसर्गासंबंधी, विश्वासंबंधी आणि सजीवांसंबंधी, खूप आणि खात्रीपूर्ण माहिती मिळविली आहे. विज्ञानाचे निष्कर्ष, योग्य परिस्थिती जुळवून आणल्यास, कुणालाही, केव्हाही, कुठेही आणि कितीही वेळा पडताळून पाहता येतात. या महितीचा अुपयोग करून आपल्या अध्यात्मिक संकल्पनांना नव्यानं पुष्टी देणं शक्य आहे.

लेखसंग्रह

एक प्रश्नचिन्ह

Category:

 

सुख-दु:ख , यश -अपयश , लाभ-हानी अनेक घटनांनी आपले जीवन भरलेले आहे. कधी-कधी परिस्थितींना तोंड देत असताना कितीतरी वेळा आपल्या मनात हा विचार येतो कि माझ्याबरोबरच असे का झाले ?…. माझ्याच जीवनात अशी लोक का आली ? इतके श्रम करुनही नेहमी मलाच का अपयश मिळते ?…….. प्रश्नांचे जाळे विणून स्वत: गुंतत जातो. जो पर्यन्त त्याचा शोध लागत नाही, उत्तर मिळत नाही तो पर्यन्त मनात विचारांचे वारे वाहतच राहतात.

लेखसंग्रह

श्राद्ध म्हणजे ऋणमुक्ती

Category:

 

भारतीय संस्कृतीने आपल्याला श्रेष्ठ संस्कारांचा बहुमोल खजाना दिला आहे. पारंपारिक प्रथा, उत्सव, जयंती, उपवास…. ह्या सर्वांद्वारे ईश्वर तसेच आपले पूर्वज, महात्म्याचा आदर करणे, त्यांची कर्मकथा आठवून त्यांच्याकडून काही शिकण्याची समज दिली आहे. त्यांच्यापैकीच एक म्हणजे श्राद्ध.

लेखसंग्रह

दुःख स्वीकारावे स्वानंदे

Category:

 

आज नाही तर उद्या हे दुःखांचे काळे ढग नक्कीच आपल्या जीवनातून निघून जातील व सुखाचा सूर्योदय होईल. म्हणून ह्या दुःखाला एक रात्र समजा. रात्र कितीही काळीभोर असली तरी सूर्याची सुखद सोनेरी किरणे ही आपल्या आयुष्यावर अचूक वेळी पडतीलच. ह्या रात्रीचा स्वीकार करा. स्वीकारभाव अनेक कठीण समस्यांना सामोरे जाण्याचे बळ देईल. त्यातच आहे खरा आनंद.

उमामहेश्वर स्तोत्रम् – मराठी अर्थासह
लेखसंग्रह

उमामहेश्वर स्तोत्रम् – मराठी अर्थासह

Category:

 

पार्वती व शंकर यांच्या स्तुतीपर असलेले हे स्तोत्र बहुतांश उपेंद्रवज्रा/इंद्रवज्रा वृत्तात रचलेले असून अत्यंत रसाळ व तितकेच समजण्यास सोपे आहे. त्याच्या पहिल्याच श्लोकातील ‘नगेंद्रकन्या’ या उल्लेखाने कालिदासाच्या कुमारसंभवातील पहिल्या सर्गातील ‘उमा’ या शब्दाच्या उपपत्तीची आठवण झाल्याखेरीज रहात नाही.

लेखसंग्रह

गणपती रहस्य

Category:

 

…… अश्या अनेक रहस्यानी भरलेले गणरायाचे रूप आपल्याला अनेक गुणांनी भरपूर करण्याची प्रेरणा देत आहे. आपण त्यांच्या रूपाला न्याहाळताना त्यांच्या गुणांना स्मृति मध्ये ठेऊन त्यांची पूजा अर्चना करावी व आपल्या जीवनातील विघ्न नष्ट करावे.

लेखसंग्रह

स्पंदन

Category:

 

आज जीवनात कोणताही बदलाव आणायचा असेल तर मनुष्य पहिला प्रश्न विचारतो ‘मीच का ?’ परिवर्तनाची अपेक्षा नेहमी दुसऱ्यांकडून केली जाते. पण ‘ स्वपरिवर्तनानेच विश्व परिवर्तन होते. हे आपण लक्षात ठेवावे.

अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग ५५ – परीक्षा

Category:

 

जीवनामध्ये प्रत्येक वेळी यश प्राप्त केल्यानंतर एका ठराविक पायरीवर आपल्या ज्ञानाची परीक्षा होते. आपण ज्ञान कितपत योग्य पद्धतीने आत्मसात केले, याची नियतीनुसार टप्प्याटप्प्याने पडताळणी होते. अशीच एक परीक्षा गुरुंनी आपल्या तीन शिष्यांची घेतली….

गर्भ संस्कार
लेखसंग्रह

गर्भ संस्कार

Category:

 

महाभारतामध्ये ‘अभिमन्यू’ ची भूमिका सर्वांना माहितच असेल. गर्भामध्ये राहून चक्रव्यूहचे ज्ञान घेणारा हा अभिमन्यू आपण कसा विसरू शकतो. जन्माला येण्यापूर्वीच इतकी मोठी विद्या आत्मसात करू शकतो. हे कधी-कधी नवलच वाटायचे, पण आज हे सत्य आपण सर्वांनाच समजून चुकले आहे. संस्कारांचे बीजारोपण जन्मानंतर नाही परंतु जन्मापूर्वीच आपण करावे व ते कसे करावे, त्याचे महत्व आपण जाणून घ्यावे.