दिनविशेष

एकावन्नावा वसुंधरा दिन

Category:

 

आज एकावन्नावा वसुंधरा दिन जगभर साजरा केला जात आहे. या वर्षीचा विषय आहे, ‘रिस्टोअर द अर्थ’- पृथ्वीचे पुनर्जीवन करा. दर वर्षी २२ एप्रिल हा दिवस जगभरात ‘वसुंधरा दिवस’म्हणजेच अर्थ डे म्हणून साजरा केला जातो. पहिला वसुंधरा दिवस २२ एप्रिल १९७० रोजी अमेरिकेत साजरा झाला.

  April 22, 2021


दिनविशेष

सनदी सेवा दिवस

Category:

 

दरवर्षी २१ एप्रिल रोजी भारतात सनदी सेवा दिवस म्हणजेच National Civil Service Day म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रशासनात उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले जाते.

  April 22, 2021


दिनविशेष

रामनवमी

Category:

 

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात.

  April 21, 2021


व्यक्ती-परिचय

ख्यातनाम गीतकार, नाटककार अनंत पाटील

Category:

 

महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे अनेक भक्तीगीते व भावगीतांचे ख्यातनाम गीतकार, नाटककार अनंत पाटील यांचं आगरी-कोळी बोलीभाषेतील साहित्य अतुलनीय आहे. आद्यदेवी एकवीरा आईवर रचलेल्या गाण्यांचा संग्रह अगणित आहे. २००१ साली त्यांना महाराष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले.

  March 26, 2021


दिनविशेष

जागतिक संगीतोपचार दिन – २६ मार्च

Category:

 

जगभरात २६ मार्च हा दिवस जागतिक संगीतोपचार दिन म्हणून साजरा केला जातो. संगीतोपचार हा एक स्वास्थ्यवर्धक उपाय आहे. आजार, व्याधी शरीराला विळखा घालत आहेत, त्यावर बर्याचदा औषधांच्या मात्राही काम करीत नाहीत. संगीतात असणार्‍या अनोख्या संमोहन शक्तीमुळे सध्या रोगांवर पूरक उपचार म्हणून संगीतोपचार लोकप्रिय होत आहे.

  March 26, 2021


दिनविशेष

मंदारमाला’ नाटकाचा पहिला प्रयोग – २६ मार्च १९६३

Category:

 

२६ मार्च १९६३ या दिवशी मंदारमाला नाटकाचा पहिला प्रयोग झाला. जय शंकरा गंगाधरा, जयोस्तुते उषा देवते… हरी मेरो जीवन प्राण आधार… अशा “मंदारमाला‘ या नाटकातील गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. त्या काळी मंदारमाला हे नाटक तुफान गाजले होते. संगीतभूषण रामभाऊ मराठे, प्रसाद रावकर, ज्योत्स्ना मोहिले, विनोदमूर्ती शंकर घाणेकर, पंढरीनाथ बेर्डे अशा दिग्गजांच्या गायन व अभिनयाने हे नाटक गाजले; त्याचे शेकडो प्रयोग झाले. त्या वेळी नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा करमरकर यांनी केले होते; तर संगीत दिग्दर्शन रामभाऊ मराठे यांचे होते.

  March 26, 2021


व्यक्ती-परिचय

व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ वंदन नगरकर

Category:

 

प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ वंदन नगरकर हे कॉर्पोरेट ट्रेनर असून ते गेली अनेक वर्ष याच क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत आहेत. ते विनोदी अभिनेते, नाटककार, लेखक राम नगरकर यांचे चिरंजीव आहेत. भाषणाचे प्रभावी तंत्र, भरारी यशाची, टर्निग पॉईट, पालकांचे चुकते कुठे? प्रभावी इंटर टेक्निक्स व स्पिक विव कॉन्फिडक्स (इंग्रजी) अशा सहा पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. अनेक प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर लेख प्रसिद्ध झाले आहेत.

  March 24, 2021