व्यक्ती-परिचय

राजीव पाटील

Category:

 

आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून पाटील यांनी गावरान विषय, सामाजिक प्रश्न तसंच वास्तवता मांडली. ‘सावरखेड-एक गाव’ , ‘जोगवा’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘पांगिरा’, ‘सनई चौघडे’, ‘ऑक्सिजन’, ‘ब्लाईंड गेम’; असे वैविध्यपूर्ण विषय दिग्दर्शित करुन प्रेषकाचं पुरेपूर मनोरंजन होईल याची खात्री घेतली.

  March 13, 2014


व्यक्ती-परिचय

समीर धर्माधिकारी

Category:

 

उत्तम शरीरयष्टी, देखण्या व रुबाबदार अदा यामुळे समीर धर्माधिकारी यांचं व्यक्तिमत्व नायक, खलनायक यासह सर्वच भूमिकांना शोभेल असंच आहे. निर्मला मच्छिंद्र कांबळे, दिल क्या करे, सत्ता, रेनकोट, मनोरंजन-द एंटरटेन्मेंट, अग्नीपंख, मुंबई मेरी जान, गेम, रंग रसिया, सिटी ऑफ गोल्ड अश्या हिंदी तर; रेसटॉरंट, लालबाग परळ, मॅटर, बाबुरावला पकडा, समांतर, मात अश्या मराठी चित्रपटातून समीर धर्माधीकारींनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत.

  March 13, 2014


व्यक्ती-परिचय

छोटा गंधर्व (सौदागर नागनाथ गोरे)

Category:

 

गायक म्हणून छोटा गंधर्व यांनी आपल्या नाट्यपदां मधुन विविधभावपूर्णता दाखवून दिली; त्यांचा लोकप्रिय नाट्यपदांपैकी ” आनंदे नटती”, “कोण तुजसंग सांग गुरुराया” “चंद्रिका ही जणू” , “चांद माझा हा हासरा”, “छळि जीवा दैवगती”, “तू माझी माउली”, “दिलरुबा दिलाचा हा”, “दे हाता शरणागता”, “नच सुंदरी करु कोपा”, “प्रिये पहा रात्रीचा समय सरुनि”, “बघुनी वाटे त्या नील पयोदाते”, “बहुत दिन नच भेटलो”, “माता दिसली समरी विहरत”, “या नव नवल नयनोत्सवा”, “रजनिनाथ हा नभी उगवला” या नाटकांचा समावेश आहे.

  March 13, 2014


व्यक्ती-परिचय

नम्रता शिरोडकर

Category:

 

नम्रता शिरोडकरने १९९८ साली “जब प्यार किसी से होता है”, या चित्रपटातील एका छोट्याश्या भुमिकेतून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्याशिवाय ‘मेरे दो अनमोल रतन’, ‘हीरो हिन्दुस्तानी’, ‘कच्चे धागे’, ‘वास्तव’, ‘आगाज़’, ‘हेरा फेरी’, ‘अस्तित्व’, ‘पुकार’, ‘अलबेला’, ‘तेरा मेरा साथ रहे’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘मसीहा’, ‘तहज़ीब’, ‘रोक सको तो रोक लो’, ‘चरस’, ‘ब्राइड एंड प्रीजुडिस’; यासह अनेक भारतीय चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत

  March 13, 2014


विनय आपटे
व्यक्ती-परिचय

विनय आपटे

Category:

 

अभिनेते विनय आपटेंचा जन्म १७ जून १९५१ साली झाला. विद्यार्थी दशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले ते विजय बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली. राज्य नाट्य स्पर्धेत विनयजींनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली.

  March 13, 2014


व्यक्ती-परिचय

जयमाला शिलेदार

Category:

 

२१ ऑगस्ट १९२६ साली पेण येथे जन्मलेल्या जयमालाबाईंचं माहेरचं नाव प्रमिला जाधव होतं. त्यांचे वडील नारायणराव जाधव हे मुंबईत वास्तव्यास होते.पण मुंबईच्या गोदीला आग लागल्यानंतर अनेक कुटुंबांनी मुंबई सोडून अन्यत्र स्थलांतर केले, त्यावेळी जाधव यांनीही आपल्या कुटुंबासह बेळगावात स्थलांतर केले. मास्तर कृष्णराव , गोविंदराव टेंबे आणि गानसरस्वती मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडे त्यांनी गायकीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले.

  March 12, 2014


व्यक्ती-परिचय

उपेंद्र लिमये

Category:

 

मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका तसंच हिंदी सिनेसृष्टीतील गुणी कलावंत म्हणून उपेंद्र लिमये हे नाव आपल्याला परिचित आहे. ८ मार्च १९७४ रोजी पुणे येथे जन्मलेल्या उपेंद्र लिमयेंना लहानपणापासूनच अभिनयकलेची आवड होती. १९८७ साली पुण्याच्या ललित कला केंद्रातून अभिनयाचं सास्त्रोक्त प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाले.

  March 12, 2014


व्यक्ती-परिचय

सुषमा शिरोमणी

Category:

 

मराठी चित्रपटांमध्ये पारंपारिक स्त्री व्यक्तीरेखेला काहिसा छेद देऊन त्याजागी “डॅशिंग वुमन” आणि “तडफदार स्त्री” ची व्यक्तीरेखा साकारण्याचं काम सुषमा शिरोमणी यांनी चपलखपणे साध्य केलं; मराठी सिनेमामध्ये सर्वप्रथम “भिंगरी” या चित्रपटातून “आयटम सॉंग” चा ट्रेंड हा सुषमा शिरोमणींमुळे रुजला आणि तोही मराठमोळ्या ढंगात. चित्रपटांच्या निर्मिती व्यतिरिक्त सुषमा शिरोमणींनी “इम्पा” या चित्रपटांसाठीच्या संघटनेचं तीनवेळा अध्यक्षपद भुषवलं असून, पायरसी विरोधी कायदा हा त्यांच्या कार्यकाळातच अमलात आला.

  February 13, 2014


अनंत गणेश गाडगीळ (दाजीकाका  गाडगीळ)
व्यक्ती-परिचय

अनंत गणेश गाडगीळ (दाजीकाका गाडगीळ)

Category:

 

अनंत गणेश गाडगीळ ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ ला सांगलीत झाला. वडिलोपार्जीत पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सची जबाबदारी दाजीकाकांनी गेल्या ७५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे समर्थरित्या पेलली. पु. ना. गाडगीळ आणि कंपनी (पीएनजी) या सराफी पेढीचे आधारस्तंभ, तरुणाईला लाजवेल असा उत्साह अंगी असणार्‍या दाजीकाका गाडगीळ यांचे १० जानेवारी २०१४ या दिवशी वृद्धापकाळाने वयाच्या ९९ व्या वर्षी पुण्यातील प्रयाग रुग्णालयात निधन झाले.

  January 10, 2014


व्यक्ती-परिचय

दिलीप कुलकर्णी

Category:

 

दिलीप कुलकर्णी हे मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक होते. एक दिग्दर्शक म्हणून ते चिकित्सक वृत्तीचे होतेच, पण त्याहीपेक्षा अजातशत्रू, सौजन्यमय व्यक्ती होते.

  December 21, 2013